जिओ, एअरटेल आणि व्हीआय नाही तर पाकिस्तानमध्ये लोक वापरतात ‘या’ टेलिकॉम कंपनीचे सिमकार्ड
जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यासारख्या मोठ्या कंपन्यांचे भारतावर वर्चस्व आहे, त्याचप्रमाणे भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये कोणती टेलिकॉम कंपनी वर्चस्व गाजवते हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया हे भारतातील तीन सर्वात मोठे खाजगी टेलिकॉम कंपन्या आहेत. तसेच भारतातील या टेलिकॉम कंपन्या त्यांचे ग्राहक टिकून राहण्यासाठी रोज नवनवीन ऑफर लाँच करत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की भारताच्या शेजारील पाकिस्तान देशात लोकं कोणत्या टेलिकॉम कंपनीचे नेटवर्क वापरतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर अनेकांना माहित नाही, परंतु असे बरेच लोकं आहेत ज्यांना माहित आहे. जर तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल, तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की पाकिस्तानमध्ये कोणत्या टेलिकॉम कंपनीचे सर्वात जास्त वापरकर्ते आहेत. तसेच तेथील लोकं सीमकार्डमध्ये कोणत्या ॲप्सच्या मदतीने रिचार्ज करतात ते देखील जाणून घेऊयात.
पाकिस्तानमध्ये आहेत या टेलिकॉम कंपन्या
भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये लोकं Jazz, Zong,टेलिनॉर आणि Ufone सारख्या टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क वापरतात. आता आपण पाकिस्तानमधील विविध टेलिकॉम कंपन्यांबद्दल जाणून घेतलं आहे, तर पाकिस्तानमध्ये कोणत्या कंपनीचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत हे देखील जाणून घेऊयात.
सर्वाधिक ग्राहकांच्या बाबतीत Jazz आघाडीवर आहे. Jazz नंतर, टेलिनॉर दुसऱ्या क्रमांकावर येतो तर Zongतिसऱ्या आणि एस्कॉम चौथ्या व Ufone पाचव्या क्रमांकावर आहे. अशातच भारतातील टेलिकॉम कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर, रिलायन्स जिओचे सर्वाधिक ग्राहक आहेत, त्यानंतर एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया, ज्याला व्ही म्हणूनही ओळखले जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ऑक्टोबर 2025 पर्यंत Jazz चे 72 दशलक्ष ते 73 दशलक्ष मोबाईल सबस्क्राइबर्स म्हणजे जवळपास 7.2 कोटी आहेत. लोकं या नेटवर्कचा तर झोंगचे 51.95 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. अशातच आपण भारतातील रिलायन्स जिओच्या सबस्क्राइबर्स पाहिले तर 500 दशलक्षाहून अधिक ग्राहकांचा आधार आहे.
लोक कोणत्या प्लॅटफॉर्मवरून रिचार्ज करतात?
पाकिस्तानमध्ये लोक त्यांचे नंबर रिचार्ज करण्यासाठी डिंग आणि मोबाईल रिचार्ज सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. तर दुसरीकडे भारतात लोकं त्यांचे मोबाईल फोन रिचार्ज करण्यासाठी फोनपे, गुगल पे, अमेझॉन पे आणि पेटीएम सारख्या अॅप्सचा वापर करतात.
