RIL AGM 2020 | Jio चा धमाका, पुढील वर्षी आत्मनिर्भर 5G, तर गुगलची 33 हजार कोटीची गुंतवणूक

| Updated on: Jul 15, 2020 | 4:41 PM

आज (15 जुलै) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं (RIL) पहिलं व्हर्चुअल आणि 43 वी सर्वसाधारण सभा झाली (Mukesh Ambani launch Atmanirbhar Jio 5G).

RIL AGM 2020 | Jio चा धमाका, पुढील वर्षी आत्मनिर्भर 5G, तर गुगलची 33 हजार कोटीची गुंतवणूक
Follow us on

नवी दिल्ली : आज (15 जुलै) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं (RIL) पहिलं व्हर्चुअल आणि 43 वी सर्वसाधारण सभा झाली (Mukesh Ambani launch Atmanirbhar Jio 5G). यामध्ये रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिलायन्सच्या भविष्यातील अनेक योजनांची घोषणाही केली. कोरोनाच्या काळात इतकी मोठी कंपनी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा व्हर्चुअलपणे आयोजित करते आहे ही पहिली वेळ आहे. या बैठकीत मुकेश अंबानी यांच्यासह की रिलायन्सचे लाखों शेअरधारक देखील सहभागी झाले. ही सभा रिलायन्सच्या भागधारकांकडून जगभरात 500 ठिकाणांवर पाहिली जात आहे.

रिलायन्सच्या या बैठकीचं आयोजन कंपनीच्या डिजिटल उपक्रमाचा भाग असलेल्या जिओ प्लॅटफॉर्मच्या (Jio Platform) रेकॉर्ड-ब्रेकिंग गुंतवणुकीनंतर करण्यात आले. रिलायन्सच्या शेअरमध्ये मार्चपासून आतापर्यंत 120 टक्के वाढ झाली आहे. आता रिलायन्सचा समावेश अशाप्रकारची गुंतवणूक असणाऱ्या जगातील निवडक 50 कंपन्यांमध्ये झाला आहे.

आकाश अंबानी यांनी रिलायन्सचा सर्वसाधारण सभेत जिओ टीव्ही+ (JioTV+) लाँच केला. ते म्हणाले, “जिओ टीव्ही+ मध्ये 12 वेगवेगळ्या प्रकराच्या ओटीटी कंपन्यांचा समावेश आहे. यात नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime),डिजनी+ (Disney+), हॉटस्टार (Hotstar), यूट्यूब (YouTube) इत्यादींचा समावेश आहे.”

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

मुकेश अंबानी यांनी जिओ 5 जी (Jio 5G) सेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्पित केले. तसेच हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पहिलं पाऊल असल्याचं म्हटलं. या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन जीओ अनेक उद्योगांना आणि माध्यमं, आर्थिक संस्था, शिक्षण, आरोग्य, शेती, स्मार्ट शहरं यासारख्या अनेक क्षेत्रांनी जोडू शकेल. या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन या सर्व क्षेत्रासाठी चांगले पर्याय शोधता येतील. मेक-इन इंडिया जीओ 5 जी पुढील वर्षापर्यंत उपलब्ध होईल, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.

मुकेश अंबानी म्हणाले, “आपल्याकडे तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रातील प्रसिद्ध गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक झाली आहे. यात सिल्वर लेक, विस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिस, केकेआर याचा समावेश आहे. डेटा ट्रॅफिकमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या काळात कोविडच्या साथीच्या रोगातही जिओचं नेटवर्क मजबूत राहिलं आहे. ग्राहक आणि तंत्रज्ञानाच्य व्यवसायाने गतिमान विकासाचा आपला वेग मिळवला आहे. आपल्या वापरकर्त्यांमध्ये आणि व्यवसायात वेगाने वाढ होत आहे.

मुकेश अंबानी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

1. Google ने 7.7% स्टेकसाठी जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक
2. रिलायन्स कर्जमुक्त होण्याच्या ध्येयाच्याही पुढे
3. रिलायन्सची 2000 कोटीपेक्षा अधिकची निर्यात, जिओ 69 हजार 372 सर्वाधिक जीएसटी देणारी कंपनी
4. 5 मिलियन यूजरने जिओ मीट अॅप डाऊनलोड केलं
5. जिओचं संपूर्ण स्वदेशी 5G नेटवर्क पुढच्या वर्षी कार्यरत होणार
6. जिओ ग्लास या व्हर्चूअल रिअलिटी गॉगलचं अनावरण. फक्त 75 ग्रॅम वजन. सध्या 25 अॅप उपलब्ध. ऑगमेंटेड रिअलिटी व्हिडीओची सोय.
7. जिओ मार्टच्या माध्यमातून किराणा दुकानांशी भागिदारी
8. जिओ मीटच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण क्षेत्रात वाढती सक्रियता
9. 150 अब्ज डॉलर्सचं बाजार भांडवल असलेली रिलायन्स पहिली भारतीय कंपनी

हेही वाचा :

 मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी, वॉरने बफेंना मागे टाकलं

Mukesh Ambani launch Atmanirbhar Jio 5G