रितेश-जेनेलियाचं दिवाळी गिफ्ट, ‘आशेची रोषणाई’च्या निमित्ताने पुन्हा एकत्र

महेश लिमये, अजय-अतुल आणि रितेश-जेनेलिया देशमुख अशी तगडी मंडळी मराठी शॉर्टफिल्मसाठी पहिल्यांदाच एकत्र आली आहेत

रितेश-जेनेलियाचं दिवाळी गिफ्ट, 'आशेची रोषणाई'च्या निमित्ताने पुन्हा एकत्र
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 4:04 PM

मुंबई : महाराष्ट्राची लाडकी जोडी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांना एकत्र पाहण्याची संधी पुन्हा चाहत्यांना मिळणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्ममध्ये रितेश-जेनेलिया झळकणार आहेत. विशेष म्हणजे जगभरात आपला डंका वाजवणारी मराठमोळी संगीतकार द्वयी अजय-अतुल यांचं पार्श्वसंगीत याला लाभलं आहे. (Riteish Deshmukh Genelia Deshmukh to feature in Short Film Aashechi Roshnai)

दिवाळी म्हणजे प्रकाशपर्व… तिमिरातुनी तेजाकडे घेऊन जाणारा आनंदोत्सव. भारतात विविध सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यातील अनेक उत्सवाला भौगोलिक किंवा प्रांताच्या मर्यादा असतात, परंतु दिवाळी हा सण संपूर्ण देशभर सर्वच नागरिक मोठ्या उत्साहात साजरा करतात.

‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं म्हटलं जातं. यंदाही दिवाळीच्या आनंदाला तोटा नसला तरी कोरोना, लॉकडाऊन यामुळे समाजातील काही घटकांच्या मनातील उत्साहाला मात्र नेहमीची झळाळी बघायला मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’ने ‘आशेची रोषणाई’ या सामाजिक संदेश देणाऱ्या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे.

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख अशी तगडी मंडळी या मराठी शॉर्टफिल्मसाठी पहिल्यांदाच एकत्र आली आहेत.

शॉर्टफिल्मचे दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये याविषयी बोलताना म्हणाले, “सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लॉकडाऊनमुळे अनेक घटकांना आर्थिक फटका बसला आहे, त्या घटकांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद पसरवूया अशी संकल्पना निर्माते पुनीत बालन यांनी मांडली, यातून ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्मची निर्मिती झाली.

“या शॉर्टफिल्मची संकल्पना ऐकता क्षणी अभिनेता रितेश देशमुख आणि संगीतकार अजय-अतुल यांनी होकार दिला. बालन यांची संकल्पना लेखक क्षितिज पटवर्धन याने त्याच्या लेखणीतून उत्तम उतरवली आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी अतिशय कमी वेळेत पार्श्वसंगीताचा साज ‘आशेची रोषणाई’ला चढवला आहे. तर रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी चार चाँद लावले आहेत.” असं लिमये म्हणाले.

निर्माते पुनीत बालन म्हणाले, “गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही निर्मिती केलेल्या दोन्ही शॉर्टफिल्मला जगभरातील गणेशभक्तांची दाद मिळाली. देशात अनलॉक प्रक्रिया सुरु झाली असली तरी सर्व व्यवहार पूर्ववत झालेले नाहीत. आम्ही प्रशासनाच्या मदतीने हजारो लोकांपर्यंत विविध स्वरुपात मदत पोहोचवली आहे. अजूनही अनेक लोकांना मदतीची आवश्यकता आहे, अशा गरजू लोकांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा आमचा हेतु आहे. ‘आशेची रोषणाई’ बघून नागरिक आपल्या जवळपासच्या गरजूंना छोटीशी मदत करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास वाटतो.” (Riteish Deshmukh Genelia Deshmukh to feature in Short Film Aashechi Roshnai)

निर्माते पुनीत बालन यांची संकल्पना असलेली ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्टफिल्म ‘पुनीत बालन स्टुडिओज’ची सामाजिक संदेश देणारी सलग तिसरी निर्मिती आहे. या शॉर्टफिल्मचे छायांकन आणि दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले आहे. पार्श्वसंगीत संगीतकार अजय-अतुल यांनी दिले आहे, क्षितिज पटवर्धन यांनी लेखन केले आहे व ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांचा व्हॉईस ओव्हर लाभला आहे.

‘आशेची रोषणाई’चे क्रिएटिव्ह हेड विनोद सातव आहेत, तर कार्यकारी निर्माते म्हणून अश्विनी तेरणीकर, कुशल कोंडे यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्टफिल्म ‘पुनीत बालन स्टुडिओज’च्या युट्यूब चॅनल, फेसबुक, इन्स्टाग्राम पेजवर विनामूल्य उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या :

रितेश देशमुखची ‘तार’ रसिकांच्या मनाला भिडणार, ‘हा’ दिग्दर्शक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार!

हिंदू-मुस्लिम एकतेवर रितेश देशमुखचा टिक टॉक व्हिडीओ

(Riteish Deshmukh Genelia Deshmukh to feature in Short Film Aashechi Roshnai)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.