बिहार पोलीस महासंचालकांनी हातात भाजपचा झेंडा घेणेच बाकी : सामना

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या तपास प्रकरणावर काल (19 ऑगस्ट) सुप्रील कोर्टाने निकाल दिला (Saamana Article on Sushant Singh Rajput case).

बिहार पोलीस महासंचालकांनी हातात भाजपचा झेंडा घेणेच बाकी : सामना
Follow us
| Updated on: Aug 20, 2020 | 8:22 AM

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या तपास प्रकरणावर काल (19 ऑगस्ट) सुप्रील कोर्टाने निकाल दिला (Saamana Article on Sushant Singh Rajput case). हा तपास कोर्टाने सीबीआयकडे सोपवला आहे. तपास सीबीआयकडे सोपवल्यामुळे मुंबई पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत आज (20 ऑगस्ट) सामना वृत्तपत्राचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. या अग्रलेखातून बिहारच्या पोलीस महासंचालकांवर निशाणा साधण्यात आला आहे (Saamana Article on Sushant Singh Rajput case).

“न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळे न्याय आणि कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये. ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी आणि हातात राजकीय पक्षाचा झेंडा आहे अशांनी तर ते धाडस करुच नये. सुशांत प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे व्हायला हवाच”, असं सामना अग्रलेखात म्हटले आहे.

“सुशांतच्या कुटुंबियांच्या मनात काही शंका असतील तर त्यावर प्रकाश पडायलाच हवा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण प्रश्न आहे मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा आणि त्यांच्यावर सुरु असलेल्या राजकीय चिखलफेकीचा. कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने कोणी करत असतील तर त्यांना रोखावेच लागेल. सुशांतला न्याय मिळो, नव्हे न्याय मिळालाच पाहिजे. मात्र मुंबई पोलीस सत्य आणि न्यायाच्या मार्गावर असतानाचा त्यांना रोखले हे बरोबर नाही”, अशी खंतही सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आली आहे.

“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील, दिल्लीतील आणि बिहारसारख्या राज्यांतील काही मंडळींना अत्यानंदाचे भरतेच आले आहे. बिहार विधानसभेची निवडणूकच जिंकली अशा पद्धतीने न्याय, सत्यचा धोशा लावून नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली”, अशी टीकाही सामना अग्रलेखातून नितीश केली.

“बिहारमधल्या पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन केले म्हणून सुशांत प्रकरणात संशय वाढतो असे कुणाचे निरीक्षण असेल आणि त्या आधारे तपास सीबीआयकडे दिला असेल तर आज भारताची राज्य घटना ही अश्रू ढाळत असेल. देशाला राज्यघटना आणि संघराज्य देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. मुंबई पोलिसांचा प्रामाणिकपणा शंभर नंबरीच आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पोलिसांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही”, असंही अग्रलेखात नमूद केले आहे.

“जिंकल्याच्या आविर्भावात पत्रकारांसोमर म्हणाले, ये न्याय की अन्याय पर जीत है, पांडे हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी हाती भाजपचा झेंडा पकडून पत्रकारांशी बोलणेच काय ते बाकी होते. पांडे यांचे म्हणणे असे की, सुशांतप्रकरणी मुंबई पोलीस योग्य दिशेने तपास करीत नाहीत. बिहार पोलिसांच्या तपासात अडथळे आणत आहेत. हे त्यांचे विधान सत्याला धरुन नाही. सुशांतच्या परिवाराने त्यांचा पुत्र गमावला आणि सुशांतने नेमकी आत्महत्या का केली हे रहस्य उलगडण्याच्या कामी पोलीस लागलेच आहेत. पण हे रहस्य म्हणजे पाताळात दडवलेली कुपी आहे. ती कुपी फक्त बिहारचे पोलीस किंवा सीबीआयलाच शोधता येईल हा भ्रम आहे”, असंही सामना अग्रलेखात म्हटले आहे.

संबधित बातम्या : 

सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये : शरद पवार

…तर सीबीआय पथकाला क्वारंटाईन करणार नाही, मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.