AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सेक्रेड गेम्स’चा थरार आता ‘स्टोरीटेल’वर अनुभवता येणार, कृणाल आळवे यांच्या आवाजात

'सेक्रेड गेम्स' या कादंबरीचा मराठी अनुवाद मृणाल काशीकर यांनी केला असून सुप्रसिद्ध वॉईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात 'सेक्रेड गेम्स' भाग 1 व 2 ची लज्जतदार कहानी 'स्टोरीटेल'वर ऐकताना रसिकश्रोते रंगून जातात.

'सेक्रेड गेम्स'चा थरार आता 'स्टोरीटेल'वर अनुभवता येणार, कृणाल आळवे यांच्या आवाजात
सेक्रेड गेम्स
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 25, 2022 | 10:58 AM
Share

आयेशा सय्यद, मुंबई : श्राव्यसाहित्यात विश्वरूपी मानके निर्माण करणारी जगविख्यात ‘स्टोरीटेल’ नवं क्षितिज पेलण्यात अग्रेसर राहिली आहे. ‘सेक्रेड गेम्स‘ (Sacred Games) या तुफान लोकप्रिय वेब मालिकेची मूळ कादंबरी आता ‘श्राव्यरूपात’ स्टोरीटेलने (Storytel) आपल्या रसिकांसाठी प्रकाशित केली आहे. यापूर्वी स्टोरीटेलने ‘वळू’ या प्रचंड लोकप्रिय चित्रपटाची रंजकदार पटकथा अभिनेते लेखक गिरीश कुलकर्णी (Girirsh Kulkarni) यांच्या आवाजात प्रकाशित केली होती. या प्रयोगाला मराठी रसिकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने ‘सेक्रेड गेम्स’ची ऑडिओ निर्मिती करण्याचा उत्साह वाढला आहे. ‘सेक्रेड गेम्स’च्या ऑडिओबुकलाही रसिक पसंती देतील असा विश्वास स्टोरीटेलच्यावतीने प्रसाद मिरासदारांना वाटतो आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद मृणाल काशीकर (Mrunal Kashikar) यांनी केला असून सुप्रसिद्ध वॉईस आर्टिस्ट कृणाल आळवे (krunal Alawe) यांच्या आवाजात ‘सेक्रेड गेम्स’ भाग 1 व 2 ची लज्जतदार कहानी ऐकताना रसिकश्रोते रंगून जातात.

काटेकर ही व्यक्तिरेखा माहीत नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. मग तुम्ही ‘सेक्रेड गेम्स’ पाहिलेलं असो की नसो. ही सुप्रसिद्ध वेब सिरीज ज्या प्रसिद्ध कादंबरीवरून बनवण्यात आली, ती कादंबरी आता ‘स्टोरीटेल’ मराठीवर ऐकायला मिळणार आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद मृणाल काशीकर यांनी केला असून सुप्रसिद्ध वॉईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात ‘सेक्रेड गेम्स’ भाग १ व २ ची लज्जतदार कहानी ऐकताना रसिकश्रोते रंगून जातात.

‘सेक्रेड गेम्स’ची नव्यानं ओळख करून द्यायला हवी का? हो, ही तीच ‘सेक्रेड गेम्स’ कादंबरी आहे, जी तुम्ही अतिशय गाजलेल्या वेब सीरिजच्या रुपात आतापर्यंत स्क्रीनवर पाहिली असेल. तुम्ही ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सिरीज पाहिलेली असली तरीही पुन्हा ऑडिओ रुपात ती ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि जर तुम्ही ती पाहिलेली नसली, तर ‘स्टोरीटेलवर’ ऐकताना त्यातला एकूणएक प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर तरंगणार आहे.

‘सेक्रेड गेम्स’चा हा भन्नाट ऑडिओ फॉर्म अगदी प्रवास करताना, ड्राईव्ह करतानाही आपण निवांत ऐकू शकता!  लेखक विक्रम चंद्रा यांची गाजलेली ‘सेक्रेड गेम्स’ ही क्राईम थ्रिलर कादंबरी ‘स्टोरीटेल’ मराठी ऑडिओबुक रुपात दोन भागांमध्ये प्रसिद्ध व्हाईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात ऐकता येणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?