तुम्हाला तणावमुक्त करायला आलाय ‘लकडाऊन’, व्हा… बी पॉझिटिव्ह!

आयेशा सय्यद, मुंबई : कोरोनाच्या (Corona) काळात सगळेच कंटाळले होते. याच विळख्यातुन आता आपण बाहेर पडत आहोत, आता संपूर्णपणे पडलो नसलो तरी आता पुन्हा मनोरंजनाची दार खुली झाली असून नवीन चित्रपटाची मांदियाळी सुरु झाली आहे. धीर गंभीर विषयांची रेलचेल असताना इष्णव मीडिया यांची निर्मिती असलेला आणि संतोष मांजरेकर दिग्दर्शित ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह‘(Luckdown Be Positive) हा […]

तुम्हाला तणावमुक्त करायला आलाय 'लकडाऊन', व्हा... बी पॉझिटिव्ह!
अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 10:20 AM

आयेशा सय्यद, मुंबई : कोरोनाच्या (Corona) काळात सगळेच कंटाळले होते. याच विळख्यातुन आता आपण बाहेर पडत आहोत, आता संपूर्णपणे पडलो नसलो तरी आता पुन्हा मनोरंजनाची दार खुली झाली असून नवीन चित्रपटाची मांदियाळी सुरु झाली आहे. धीर गंभीर विषयांची रेलचेल असताना इष्णव मीडिया यांची निर्मिती असलेला आणि संतोष मांजरेकर दिग्दर्शित ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह(Luckdown Be Positive) हा सिनेमा रिजीज झाला आहे. या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. लॉकडाऊनमध्ये एका लग्न घरात नेमकं काय काय घडलं असेल याच चित्रण या चित्रपटात आहे. लॉकडाऊननंतर हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित झालाय, ज्यात तब्ब्ल 15 नावाजलेले चेहरे एकत्र दिसत आहेत. या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटाचा सुवर्णकाळ जगलेल्या ‘शुभा खोटे’  (Shubha Khote) यांची मुख्य भूमिका आहे.अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आणि प्राजक्ता माळी  (Prajakta Mali) यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. तसंच रूचिरा जाधव (Ruchira Jadhav), समीर खांडेकर (Sameer Khandekar) , स्नेहा रायकर (Sneha Raikar) यांच्यासह 15 कलाकार तुम्हाला एकाच पडद्यावर बघायला मिळतात.

सिनेमाची गोष्ट

एका जोडप्याचं लग्न होतं. पण त्याच काळात कोरोनाचा देशात शिरकाव होतो आणि लॉकडाऊन जाहीर होतं. मग या जोडप्याला एकांत मिळवण्यासाठी कसरत करावी लागते. त्यांना ती प्रायव्हसी मिळते का? आणि या लॉकडाऊनच्या काळात एका घरात काय-काय गमतीजमती घडतात, याविषयी हा सिनेमा आहे.

गाण्यांची जादू

‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हा चित्रपट आज रिलीज झाला. या चित्रपटाची गाणी ही सध्या ट्रेंड होत असून, बेधुंद मी हे गाणं हे तरुणाच्या ओठांवरती थिरकत आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचे परिणाम ही आपण पाहिले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची लग्न रखडली आणि अनेकांची झाली पण ते सगळेच जिथे होते तिथे अडकले तर अशाच एका लग्नाची गोष्ट ‘लकडाऊन’ सांगत आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश – विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मितीची धुरा स्मिता खरात यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे

संबंधित बातम्या

भव्यदिव्य सेट, सुरेल गाण्यांचा नजराणा, आलिया भटचा गंगुबाई काठियावाडी प्रेक्षकांच्या भेटीला

Malaika Arora : “पॅन्ट घालायला विसरली का?”, मलायका अरोरा पुन्हा ट्रोल

करीनाने केलं होतं शाहिद कपूरला प्रपोज, पण ‘या’ कारणामुळे झालं ब्रेकअप, एक अधुरी प्रेमकहानी

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.