जमीन माझी गेली, माझ्या बापाचं नाव समृद्धी महामार्गाला द्या: शेतकरी

शहापूर : मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाच्या नामकरणावरुन श्रेयवादाची लढाई सुरु आहे. आता अशातच एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने समृद्धी महामार्गाला आपल्या वडिलांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हरीभाऊ धामणे असं या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. “समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि महात्मा गांधी यांची नावं द्यावी अशी मागणी होत आहे. समृद्धी महामार्ग भिवंडी तालुक्यातून जात आहे. या महामार्गात माझी शेतजमीन जात असल्याने, सातबाऱ्यावर माझ्या वडिलांचे नाव असल्याने त्यांचे नाव द्यावे.” अशी मागणी […]

जमीन माझी गेली, माझ्या बापाचं नाव समृद्धी महामार्गाला द्या: शेतकरी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

शहापूर : मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाच्या नामकरणावरुन श्रेयवादाची लढाई सुरु आहे. आता अशातच एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने समृद्धी महामार्गाला आपल्या वडिलांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हरीभाऊ धामणे असं या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

“समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि महात्मा गांधी यांची नावं द्यावी अशी मागणी होत आहे. समृद्धी महामार्ग भिवंडी तालुक्यातून जात आहे. या महामार्गात माझी शेतजमीन जात असल्याने, सातबाऱ्यावर माझ्या वडिलांचे नाव असल्याने त्यांचे नाव द्यावे.” अशी मागणी हरीभाऊ धामणे यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, समृद्धी महामार्गासाठी जमीन घेतल्याच्या बदल्यात सरकारने कोणताही मोबदला दिलेला नाही. तसेच सातबाऱ्यावर कोणतीही स्वाक्षरी न करता, माझी जमीन लाटल्याचा आरोप हरीभाऊ धामणे यांनी केला आहे.

त्यामुळे, समृध्दी महामार्गाला माझे वडील वाकळू धामणे यांचे नाव दिल्यास, शेतकरी समाजाचा गौरव ठरेल असेही धामणे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेकडून बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी

शिवसेना नेते आणि राज्य मंत्रीमंडळाचे सदस्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

भाजपकडून वाजपेयींच्या नावाची चर्चा

शिवसेनेने बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी केली तरी भाजपच्या गोट्यात समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव द्यावं अशी चर्चा आहे.

श्रीहरी अणेंकडून महात्मा गांधींचं नाव देण्याची मागणी

समृद्धी महामार्गाला नाव देण्याच्या वादात माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यास विरोध केला होता. श्रीहरी अणे यांनी फेसबूक पोस्ट लिहून हा विरोध केला होता.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.