AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीत पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या, हल्लेखोर पसार

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची हत्या होऊन चार दिवस उलटले असताना आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याचा खून झाला (Sangli ncp leader murder) आहे.

सांगलीत पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या, हल्लेखोर पसार
मयत मनोहर पाटील
| Edited By: Anish Bendre | Updated on: Feb 07, 2020 | 7:28 AM
Share

सांगली : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची हत्या होऊन चार दिवस उलटले असताना आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याचा खून झाला (Sangli ncp leader manohar patil murder) आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि कवठे महाकाळ पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील यांचा खून झाला आहे.

मनोहर पाटील हे कवठे महाकाळ पंचायत समितीचे माजी सभापती आहे. हारोली येथील शेतात अज्ञात हल्लेखोरांनी मनोहर पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्यात मनोहर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

सांगली जिल्ह्यातील खटावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची 2 फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली होती. पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केला. आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आहेत. दरम्यान त्यानतंर चार दिवसांनी मनोहर पाटील यांचा खून झाला (Sangli ncp leader manohar patil murder)  आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आनंदराव पाटील यांची हत्या

आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आहेत. आनंद पाटील हे पलूस तालुक्यातील खटाव गावापासून काही अंतरावर ब्रह्मनाळ गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या त्यांच्या शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. काम आटोपून काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घराकडे परतत असताना, वाटेत दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. पाटील यांना रक्तबंबाळ करुन हल्लेखोर पळून गेले. आनंदराव पाटील यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती.

या हल्ल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले.  त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू  (Sangli ncp leader manohar patil murder)  झाला.

संबंधित बातम्या : 

अजित पवारांच्या सचिवाच्या भावावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर पसार

अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या भावाची हत्या, सांगली पोलिसांची पाच पथकं शोधकार्यात

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली