अजित पवारांच्या सचिवाच्या भावावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर पसार

सांगली जिल्ह्यातील खटावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची हत्या करण्यात आली (anandrao patil sangli died) आहे.

अजित पवारांच्या सचिवाच्या भावावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर पसार
Follow us
| Updated on: Feb 02, 2020 | 8:23 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील खटावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची हत्या करण्यात आली (anandrao patil sangli died) आहे. पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केला. आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आहेत.

आनंदराव पाटील हे पलूस तालुक्यातील खटाव गावापासून काही अंतरावर ब्रह्मनाळ गावाच्या हद्दीतील शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. ते काम आटोपून दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीवरुन आपल्या घराकडे परतत असताना रस्त्यात काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आनंदराव पाटील रक्तबंबाळ झाले.

यानंतर आनंदराव पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. आनंदराव पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान आनंदराव पाटील यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या हल्ल्याची माहिती मिळताच भिलवडी पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. या हल्ल्यामागे राजकीय पार्श्वभूमीवर आहे की अन्य काही याचा तपास आता पोलीस घेत (anandrao patil sangli died) आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.