पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात, 2 चिमुरड्यांसह एकाच घरातील 6 जणांचा मृत्यू

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचा गाडीवरुन ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात, 2 चिमुरड्यांसह एकाच घरातील 6 जणांचा मृत्यू
| Updated on: Jul 31, 2019 | 7:58 AM

सातारा : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (pune-bengluru national highway) चालकाचा गाडीवरुन ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

साताऱ्यातील काशीळ गावाजवळ गांधीनगर येथे भीषण अपघात झाला. पुणे बंगळूर महामार्गावरुन जात असताना चालकाचा गाडीवरुन ताबा सुटला आणि गाडी झाडाला जाऊन धडकली. यामुळे गाडीत बसलेल्या सौदागर कुटुंबियातील 6 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. बोरगाव पोलीस ठाण्याच्या जवळ ही घटना घडली आहे.

दरम्यान मृत झालेल्या व्यक्तींमध्ये 2 पुरुष, 2 महिला आणि दोन चिमरुड्यांचाही समावेश आहे. यातील दोन चिमुरड्यांपैकी एका मुलाचे वय साडे तीन वर्ष, तर मुलीचे वय पाच वर्ष आहे. तर चालक आणि लहान मुलगी गंभीर जखमी आहे. त्या दोघांवरही गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु आहेत

निजामुद्दीन सौदागर असे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे नाव आहे. हे सर्व कुटुंब कर्नाटकातील धारवाडमध्ये राहत होते. दरम्यान मृतातील व्यक्तीचे ओळख पटविण्याचे काम अद्याप सुरु आहे.