…म्हणून प्रियांका-निकच्या लग्नसोहळ्यावर ‘पेटा’ नाराज

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांचं जोधपूरमध्ये शाही थाटामाटात लग्न पार पाडलं. मात्र, त्यांच्या या लग्नावर पिपल फॉर द इथिक्स ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल(पेटा) इंडियाने निषेध नोंदवला आहे. लग्नामध्ये घोड्याचा गैरवापर केल्याचा आरोप करुन पेटाने ट्वीट करत याबाबतचा निषेध नोंदवला आहे. प्रियांका आणि निक यांनी 1 डिसेंबरला ख्रिश्चन तर 2 डिसेंबरला […]

…म्हणून प्रियांका-निकच्या लग्नसोहळ्यावर ‘पेटा’ नाराज
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांचं जोधपूरमध्ये शाही थाटामाटात लग्न पार पाडलं. मात्र, त्यांच्या या लग्नावर पिपल फॉर द इथिक्स ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल(पेटा) इंडियाने निषेध नोंदवला आहे. लग्नामध्ये घोड्याचा गैरवापर केल्याचा आरोप करुन पेटाने ट्वीट करत याबाबतचा निषेध नोंदवला आहे. प्रियांका आणि निक यांनी 1 डिसेंबरला ख्रिश्चन तर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने लग्न केलं. यामध्ये 2  डिसेंबरला झालेल्या हिंदू पद्धतीच्या लग्नसोहळ्यावेळी लग्नमंडपात जाण्यासाठी निकने कोणत्याही लक्झरी कारचा वापर न करता घोड्याचा वापर केला होता. पेटाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “घोड्यावर बसल्यानंतर निकने त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी चाबूक आणि साखळीचा वापर केला. त्यामुळे त्या घोड्याला इजा होऊ शकली असती. प्रियांका आणि निक तुमच्यासाठी हा दिवस आनंददायी ठरला असला, तरी प्राण्यांसाठी हा दिवस वाईट ठरला.” पेटाने केलेल्या ट्वीटवर प्रियांका आणि निकने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी देखील प्रियांका आणि निकने आपल्या लग्नात फटाके फोडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर चाहत्यांनी प्रियांकाला भलतचं ट्रोल केलं होतं. पाहुण्यांच्या कॅमेरा मोबाईलवर बंदी प्रियांका आणि निकच्या लग्नासाठी खास नियमावली बनवण्यात आली होती. कोणत्याही पाहुण्याला लग्नमंडपात आपल्यासोबत कॅमेरावाला मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घातली गेली होती. लग्न सोहळ्यादरम्यान पाहुण्यांना विना कॅमेऱ्याचा मोबाईल दिला गेला होता. दरम्यान, जिथे प्रियांका-निकचा लग्न सोहळा पार पडला ते उमेद भवन थ्री डी लायटिंगने सजवण्यात आलं होतं.  लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी एकूण 64 आलिशान रुम्स, 22 पॅलेस रुम आणि 42 स्वीट्स बुक करण्यात आले होते. उमेद भवनचं चार दिवसाचं भाडं तब्बल 4 कोटी इतकं देण्यत आलं, असं सांगितलं गेलं.

Non Stop LIVE Update
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.