AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीतील प्रचार अंतिम टप्प्यात; शरद पवार यांचं आवाहन काय? म्हणाले, गेले काही दिवस मी…

Sharad Pawar Bhor Sabha Loksabha Election 2024 : बारामतीतील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शरद पवार यांचं आवाहन काय? भोरच्या सभेत शरद पवार नेमकं काय म्हणाले? गेले काही दिवस मी..., शरद पवार यांनी या सभेत नेमकं काय म्हणाले? महत्वाचे मुद्दे वाचा सविस्तर...

बारामतीतील प्रचार अंतिम टप्प्यात; शरद पवार यांचं आवाहन काय? म्हणाले, गेले काही दिवस मी...
शरद पवार
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 05, 2024 | 1:53 PM
Share

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोरमध्ये महाविकास आघाडीची सभा होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नाना पटोले, सुनील केदार, अमोल कोल्हे, संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत ही सभा होत आहे. या सभेत बोलताना शरद पवार यांनी स्थानिकांना आवाहन केलं आहे. गेले काही दिवस मी महाराष्ट्रमध्ये फिरत आहे. त्याठिकाणी जाऊन भूमिका मांडली आणि मला आनंद आहे की, लोकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांचं आवाहन काय?

या देशात अनके राजेराजवाडे होऊन गेले. त्यांनी इतिहास निर्माण केला. हे राज्य जनतेचे आहे. राजेराजवाड्यांची सत्ता लोकशाहीमध्ये राहिली नाही. अनेक राजे होऊन गेले पण यापैकी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावं आजपर्यंत घेतलं जातं. हे जनतेचं राज्य आहे. आज देशाच्या राजधानीतले अरविंद केजरीवाल राज्यकर्ते होते. ते जेल मध्ये पाठवले. जनता उत्तर देईल. तुम्हा सर्वाना विनंती करतो सुप्रिया सुळे यांना प्रचंड मताने विजयी करा, असं आवाहन शरद पवार यांनी भोरकरांना केलं.

नाना पटोले काय म्हणाले?

नाना पटोले यांनीही भोरच्या सभेला संबोधित केलं. दुसऱ्यांची घर फोडणारी या देशात निर्माण झाली. पण सामान्य जनता आमच्या मागे उभी आहे. महाराष्ट्रात 45 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील असं चित्र आज आहे. हे राजकीय अग्निवीर झाले आहेत. हे अग्नीवीरवाले भोरमधील जे हॉटेल मालक माविआकडे आहेत त्यांना धमकवतात. पोलिसांमार्फत धमक्या दिल्या जातात. अनेक हॉटेल मालकांचे मला फोन आले. देशभरातील 72 हजर कोटीची शेतकऱ्यांची कर्ज मनमोहन सिंग, शरद पवारसाहेब आणि आमचं सरकार असताना माफ झाली, असं नाना पटोले म्हणाले.

हजारो कोटी खर्च करून काहीही गरज नसताना नवीन संसद इमारत बांधली, ही तानाशाही आहे. सगळं विकून देशाला कर्जबाजरी केलं. त्यामुळे लोक आमच्या पाठिशी आहेत. त्यामुळे 5 लाखांच्या मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील. तुतारी पंजाने पकडली जाते. पंजा आणि तुतारीचीला मजबूत पकडण्यासाठी आहे, असं नाना पटोले म्हणाले.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?