AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shehzaad Poonawalla : भारताच्या राजकारणातील जोकर…भाजपच्या माजी प्रवक्त्याचा तेज प्रतापवर घणाघात, काय घडलं?

Shehzaad Poonawalla : शहजाद पूनावालानं तेज प्रतापवर घणाघात केला असून त्याला भारतीय राजकारणाचा जोकर असं म्हटलं आहे.

Shehzaad Poonawalla : भारताच्या राजकारणातील जोकर...भाजपच्या माजी प्रवक्त्याचा तेज प्रतापवर घणाघात, काय घडलं?
| Updated on: Nov 06, 2026 | 10:09 PM
Share

भाजपचा माजी प्रवक्ता शहजाद पूनावालानं ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘राईज अँड फॉल’ सीझन २ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आणि प्रियांका चहर चौधरी व गौतम गुलाटी यांचा पराभव करून ते विजयी ठरला. त्यानं ३५ लाख रुपयांचं बक्षीस देखील जिंकलं असून ते पैसे बिहार आणि आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दान करण्याचं वचन दिलं. पण, त्यांच्या विजयानं प्रत्येकजण खूश नव्हता. अंतिम फेरीत नसलेल्या तेज प्रताप यादवनं याला मतचोरी म्हटलं आणि गौतम गुलाटी जिंकण्यास पात्र होता असं सांगितलं.

पेंटहाऊसमध्ये तेज प्रताप आणि शहजाद यांची चांगली मैत्री होती. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, शहजादनं तेज प्रतापच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, त्याला तळघरात पाठवलं जाण्याच्या भीतीनं तो शोमधून पळून गेला होता.

‘राईज अँड फॉल’ सीझन २ मधील त्याच्या विजयाला ‘मतचोरी’ म्हटल्याबद्दल शहजादनं तेज प्रतापला सडेतोड उत्तर दिलं. त्यानं तेज प्रतापच्या कुटुंबावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख केला, ज्यात चारा घोटाळा आणि गट क व गट ड भरतीमधील कथित अनियमिततांचा समावेश आहे. शहजाद म्हणाला की, त्याच्या कुटुंबावरील आरोप पाहता, तेज प्रतापनं इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. निवडणुकीच्या निकालांवरील राजकीय प्रतिक्रियांचा संदर्भ देत तो म्हणाला की, निवडणूक हरल्यानंतर लोक अनेकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्याचप्रमाणे, तो म्हणाला की, रिॲलिटी शोमध्ये हरल्यावर स्पर्धक अनेकदा शो आणि त्याच्या निर्मात्यांना दोष देतात.

तेज प्रतापवर शहजादचं प्रत्युत्तर

शहजाद तेज प्रतापच्या गेमप्लेबद्दल म्हणाला की, ‘दुर्दैवानं, तेज प्रतापला शोबद्दल काहीच माहिती नव्हती. पुढे काय करायचं, कोणाला मत द्यायचं, हे तो मला सतत विचारत होता. त्याला तळघरात जावं लागेल या भीतीनेही तो खूप घाबरला होता. मी त्याला म्हणालो, ‘जरी तू तळघरात गेलास तरी काळजी करू नकोस. आम्ही तुला मदत करू.’ पण तो इतका घाबरला होता की तो शोमधून पळून गेला.’

शहजादनं तेज प्रतापला ‘भारताच्या राजकारणातील जोकर’ म्हटलं

शहजादनं तेज प्रतापला ‘भारताच्या राजकारणातील जोकर’ म्हणत त्याच्यावर टीका केली. तो म्हणाला की, राजकीय नेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात, तर तेज प्रताप एक जोकर आहे. तो पुढे म्हणाला, ‘मला नाही वाटत की, बिहारमध्ये कोणी त्याला गांभीर्याने घेतं आणि बघा, चांगली गोष्ट ही आहे की मी जिंकलेले सर्व पैसे बिहारच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी दान केले. त्यामुळे कदाचित त्यानं बिहारच्या लोकांकडून लुटलेल्या पैशांपैकी काही रक्कम बिहारच्या लोकांना परत करावी, हे त्याच्या स्वतःच्या प्रतिमेसाठी चांगलं ठरेल.’

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?