AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Extramarital Affair : नवरा आजारी पडल्यावर सासू जावयाकडे आकर्षित झाली, जावई नजरेत भरला, मग दोघांनी मिळून केलं असं कांड सगळेच हडबडले

Extramarital Affair : कौटुंबिक नात्यांमध्ये मर्यादा पाळावी लागते. काहीवेळा या मर्यादांचा विसर पडतो. अशा अपवादा‍त्मक घटना घडतात. त्यामुळे सगळं घर उद्धवस्त होतं. असाच एक प्रकार समोर आलाय.

Extramarital Affair : नवरा आजारी पडल्यावर सासू जावयाकडे आकर्षित झाली, जावई नजरेत भरला, मग दोघांनी मिळून केलं असं कांड सगळेच हडबडले
Extramarital Affair
| Updated on: Nov 06, 2026 | 10:01 PM
Share

सासू सूनेसारखंच सासू आणि जावयाचं नातं असतं. या नात्यात एक आदर, सन्मानाची भावना असते. प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते. ती पाळावी लागते. पण काहीवेळेला लोकांना या नातेसंबंधांचा विसर पडतो. नात्यात मर्यादा पाळली जात नाही. यूपीच्या उन्नावमध्ये असचं एक प्रकरण समोर आलय. लोक त्या बद्दल ऐकून हैराण आहेत. एक महिला आपल्या आजारी नवऱ्याला सोडून जावयासोबत पळून गेली. ही महिला जाताना घरात पुरलेलं सोन सुद्धा घेऊन पसार झाली. या प्रकरणात आजारी नवरा आणि मुलाने एसपीकडे जाऊन तक्रार दिली. महिलेच्या मुलाने पोलीसात तक्रार नोंदवल्यानंतर एसपी जय प्रकाश सिंह यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. महिलेने काही काळापूर्वी आपली 10 बिघा जमीन नातीच्या नावावर केली होती. एसपीने या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे.

मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार जवळपास 15 वर्षापूर्वी बहिणीचं सोहरामऊ येथे लग्न झालं होतं. लग्नानंतर पतीने बहिणीची हत्या केल्याचा आरोप आहे. बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलीच्या पालनपोषणाचा विचार करुन कुटुंबाने त्यावेळी गुन्हा नोंदवला नाही. त्यानंतर सासू आणि जावयामध्ये जवळीक वाढायला सुरुवात झाली आहे. जावयाचं घरी येणं-जाणं वाढलं. वडिलांनी याला विरोध केल्यानतंर घरी भांडणं होऊ लागली. मात्र, त्यानंतरही दोघांची जवळीक कमी झाली नाही. आता सासूच जावयासोबत फरार झाली आहे.

दागिन्यांची किंमत किती?

खानदानी दागिन्यांसंदर्भातही मोठा आरोप आहे. मुलाचं आणि वडिलांचं म्हणणं आहे की, घराच्या आत खड्डा खणून त्यात खानदानी दागिने पुरले होते. या दागिन्यांमध्ये दोन किलो चादी आणि आठ तोळे सोनं होतं. महिलेने घरातून पळून जाताना जमीन खणली व दागिने घेऊन पसार झाली. लाखोंमध्ये या दागिन्यांची किंमत आहे.

आईने हे काम गुपचूप केलं

मुलाने आपल्या तक्रारीत जमिनीवरुन सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. मुलाचा आरोप आहे की, 14 सप्टेंबरला त्याच्या आईने जावयाच्या सांगण्यावरुन वडिलांनी विकत घेतलेली जमीन नातीच्या नावावर केली. जमिनी नातीच्या नावावर केल्याची माहिती कुटुंबाला नंतर कळली. मुलाचं म्हणणं आहे की, आईने हे काम गुपचूप केलं. वडिलांना विश्वासात घेतलं नाही.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?