विदेशी फंडींगच्या आरोपावर सीजेपीच्या सौरव दास यांचा पलटवार, पीएम मोदी यांच्या आवाजात व्हिडीओ केला पोस्ट
आमचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच त्याविरोधात नकारात्मक प्रचार केला जात होता. संघटनेची पहिली पत्रकार परिषद ३ जून रोजी झाली, तर पहिली निदर्शने ६ जून रोजी झाली. तेव्हापासून केल्या जात असलेल्या या आरोपांच्या पुराव्याची मागणी आम्ही करत आहोत असे सौरव दास यांनी म्हटले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने देशात पेपर फुटी प्रकरणात मोठे आंदोलन उभे करत अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दाखवला आहे. सीजेपीवर सत्ताधारी भाजपाने विदेशी फंडींगचा आरोप केला आहे. या संदर्भात आता सीजेपीचे नेते सौरव दास यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी एक्सवर पंतप्रधान मोदी यांच्या आवाजात ऑडिओ शेअर करत सौरव दास यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. दास म्हणाले की विदेशी फंडींगवरुन केलेले आरोप निरर्थक आहेत. सरकारने या आरोपाचे कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. त्यांनी या आरोपांना आधार काय आहे ? आंदोलन सुरु होण्याआधीच आपल्या संघटनेविरोधात नकारात्मक प्रचार सुरु केला आहे.
वास्तविक, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सीजेपीवर आरोप केला आहे की तरुणांच्या या आंदोलनाला विदेशी फंडिंग मिळत आहेत. त्यांनी दावा केला होता की विदेशी स्रोत, डिप स्टेटशी जोडलेले लोक आणि भारत विरोधी संघटना या आंदोलनाला मदत करत आहेत. मंत्र्याने सीजेपीचे अभिजीत दीपके आणि आशुतोष रांकावर देखील गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपानुसार दीपके यांना अमेरिकेत राहाणाऱ्या लोकांची आणि रांका यांना पाकिस्तानी नेत्यांकडून आर्थिक मदत मिळत आहे. विदेशी फंडींगशी संबंधित लोक देशाच्या विरोधात एक खास नॅरेटिव्ह करण्यात एकत्र झाले आहेत.
आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न – सौरव दास
सौरव दास यांनी या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे, ते म्हणाले डावे गट आणि कट्टरपंथी नेटवर्ककडून आधीही आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता तेच आरोप सरकारचे एक ज्येष्ठ मंत्री परत करत आहेत. हे लाजीरवाणे असून चार ते पाच महिने झाल्यानंतर आरोपाच्या समर्थनार्थ कोणतेही पुरावे देण्यात आलेले नाहीत.
पुरावे सादर करण्याची मागणी
सीजेपीने जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर एक्सवर नाराजी व्यक्त केली आहे. संघटनने लिहिलंय की ही लाजीरवाणी स्थिती आहे की केंद्र सरकारचा एक मंत्री काहीही म्हणतो आणि त्याच्याकडे कोणतेही पुरावे मागितले जात नाहीत. हेच कारण आहे की वरच्या पदावर बसलेल्या लोकांच्या वक्तव्यालाही आज काही महत्व राहिलेले नाही. या प्रकारे विदेशी फंडिंगच्या आरोपासंदर्भात सीजेपीच्या नेत्यांनी मंत्र्यांना प्रश्नांचे उत्तर देण्यास आणि दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे. पुराव्याशिवाय या प्रकारचे आरोप करत तरुणांचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
