Harley-Davidson: जबरदस्त! हार्ले-डेव्हिडसनची दमदार बाईक लॉन्च! रॉयल इनफिल्डला देणार टक्कर
मायलेजच्या बाबतीतही रायडर्ससाठी चांगली बातमी आहे. Harley-Davidson च्या दाव्यानुसार, ही बाइक 34 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते.

2027 Harley-Davidson Sprint 440: प्रसिद्ध दुचाकी कंपनी हार्ले डेविडसनने आपली सर्वात नवी आणि एंट्री-लेव्हल क्रूझर बाइक 2027हार्ले-डेव्हिडसन Sprint 440 सादर केली आहे. ही केवळ एक सामान्य बाइक लाँच नाही, तर भारतीय रस्त्यांवर लोकप्रिय असलेल्या रॉयल इनफिल्ड Meteor 350 आणि ग्लोबल मार्केटमधील प्रसिद्ध होंडा रेबेल300 ला थेट टक्कर देण्याची तयारी आहे. Hero MotoCorp सोबत मिळून विकसित करण्यात आलेली ही मोटरसायकल स्टायलिश, हलकी आणि सहज चालवता येणारी Harley हवी असणाऱ्या रायडर्ससाठी एक परफेक्ट पॅकेज ठरणार आहे.
लूक आणि डिझाइन
हार्ले-डेव्हिडसन Sprint 440 वर पहिली नजर पडताच तिच्या लूककडे लक्ष वेधलं जातं. कंपनीने या बाइकच्या डिझाइनमध्ये आपली आयकॉनिक क्रूझर स्टायलिंग अतिशय सुंदर पद्धतीने समाविष्ट केली आहे. बाइकच्या पुढील बाजूस क्लासिक राउंड LED हेडलॅम्प देण्यात आला आहे. त्यामुळे बाइकला रेट्रोसोबतच मॉडर्न टच मिळतो. याशिवाय, बॉब्ड रिअर फेंडर, स्कल्प्टेड फ्युएल टँक आणि लो-स्लंग स्टान्स यामुळे ही बाइक दुरूनही प्रीमियम हार्ले डेविडसन असल्याचा फील देते.
या बाइकची सर्वात मोठी USP म्हणजे तिची सीट हाइट. कंपनीने यात केवळ 671 mm इतकी कमी सीट हाइट दिली आहे. याचा थेट फायदा कमी उंचीच्या रायडर्सना किंवा पहिल्यांदाच हेवी क्रूझर बाइक चालवणाऱ्यांना होणार आहे. ट्रॅफिकमध्ये किंवा लांब प्रवासातही बाइक सहज आणि आत्मविश्वासाने कंट्रोल करता येईल.
इंजिन आणि परफॉर्मन्स; हायवे राइडिंगचा अस्सल अनुभव
या बाइकच्या इंजिनबद्दल बोलायचं झालं, तर 2027 हार्ले-डेव्हिडसन Sprint 440 मध्ये 440cc सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑईल-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 27 hp ची कमाल पॉवर आणि 4,000 rpm वर 38 Nm इतका दमदार टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीने पाचवा आणि सहावा गिअर ओव्हरड्राइव्ह रेशो म्हणून ट्यून केला आहे.
याचा फायदा हायवेवर 90 ते 100 किमी प्रतितास वेगाने क्रूझिंग करताना होणार आहे. या वेळी इंजिनवर जास्त दबाव जाणवणार नाही आणि रायडर्सना रिलॅक्स्ड राइडिंग एक्सपीरियन्स मिळेल. मायलेजच्या बाबतीतही रायडर्ससाठी चांगली बातमी आहे. Harley-Davidson च्या दाव्यानुसार, ही बाइक 34 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते.
भारतात कधी दाखल होणार?
ही मोटरसायकल 2027 च्या सुरुवातीपासून जगभरातील विविध बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, भारतातील लॉन्चची अचूक तारीख आणि किंमत याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. विशेष म्हणजे, 440cc प्लॅटफॉर्म Hero MotoCorp सोबत मिळून विकसित करण्यात आला आहे.
त्यामुळे ही बाइक भारतीय बाजारातही लवकरच दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात एंट्री-लेव्हल प्रीमियम क्रूझर सेगमेंटमध्ये आधीच Royal Enfield Meteor 350 सारख्या बाइक्सची मजबूत पकड आहे. अशा परिस्थितीत 2027 हार्ले-डेव्हिडसन Sprint 440 भारतात दाखल झाल्यास या सेगमेंटमधील स्पर्धा आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.
