AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankita Lokhande | बॉयफ्रेंडसह ‘बँग बँग’ गाण्यावर नृत्य, अंकिता लोखंडेवर सुशांतचे चाहते नाराज!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. अंकिता सोशल मीडियावर तिचा होणारा नवरा विक्की जैन बरोबर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Ankita Lokhande | बॉयफ्रेंडसह ‘बँग बँग’ गाण्यावर नृत्य, अंकिता लोखंडेवर सुशांतचे चाहते नाराज!
| Updated on: Nov 25, 2020 | 7:32 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. अंकिता सोशल मीडियावर तिचा होणारा नवरा विक्की जैन बरोबर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अंकिताने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि विक्की व्हाइट कलरच्या नाईटड्रेसमध्ये हृतिक रोशन आणि कतरिना कैफच्या ‘बँग बँग’ गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. ‘विक्की आणि अंकी, नाईट ड्रेसमध्ये तेही डान्स करताना’, म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Sushant’s fans angry over Ankita Lokhande, dancing to ‘Bang Bang’ song with boyfriend) सुशांतच्या चाहत्यांनी अंकिताला केले ट्रोल अंकिताचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांनी खूप आवडला आहे. तिच्या चाहत्यांनी दोघांच्या डान्सचे कौतुकही केले आहे. मात्र, सुशांतच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला नाही आणि त्यामुळे हा व्हिडीओ जोरदार ट्रोल होत आहे. एका यूजर लिहिले की, आम्ही सुशांतला अजून विसरलो नाही. दुसर्‍याने लिहिले की, हे काय आहे? हे तुझे सुशांतवरचे प्रेम आहे का? अशा वेगवेगळ्या कमेंट सुशांतच्या चाहत्यांनी अंकिताच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

मृत्यूनंतर सुशांतला न्याय मिळावा म्हणून अंकिताने सोशल मिडियावर मोहीम सुरू केली होती. मात्र, सुशांतचा मृत्यू होऊ पाच महिनेच उलटले असताना अंकिता अशा प्रकारचे व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करत असल्यामुळे सुशांतच्या चाहत्यांचा राग अनावर होताना दिसत आहे. सुशांतची मृत्यूनंतर त्याची एकेकाळची प्रेयसी अंकिता लोखंडे हिच्यावरही मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले होते. त्यामध्ये अंकिता राहत असलेला फ्लॅट हा सुशांतचा आहे आणि सुशांतच या फ्लॅट पैसे भरतो असा आरोप अंकितावर करण्यात आली होता. त्यानंतर तिने सोशल मीडियावर चाहत्यांना आपल्या मालाड येथील फ्लॅटची काही माहिती शेअर केली होती. अंकिताने आपल्या फ्लॅटच्या नोंदणीची प्रत आणि बँकेचे काही कागदपत्राचे फोटो पोस्ट केले होते. अंकिताच्या या पोस्टवर सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तिने देखील प्रतिक्रिया दिली होती. यात तिने अंकिताला पाठिंबा देताना तिचं कौतुक केल होत. अंकिताच्या या पोस्टवर सुशांतची बहीण श्वेताने म्हटलं, “तू एक स्वतंत्र मुलगी आहे. मला तुझा अभिमान आहे. श्वेताशिवाय इतर अनेक सेलिब्रेटिंनी देखील अंकिताच्या या इन्स्टा पोस्टवर कमेंट केली होती. अॅक्टर महेश शेट्टीने म्हटलं होत, “अंकिता तुला स्पष्टीकरण देण्याची कोणतीही गरज नाही. आम्हाला तुझा अभिमान आहे.” सुशांतची एकेकाळची प्रेयसी अंकिता लोखंडे ज्या घरात राहते त्याच्या कर्जाचा हप्ता सुशांत सिंह भरत होता, अशी चर्चा होती. त्यालाच उत्तर म्हणून अंकिताने आपल्या फ्लॅटची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. तसेच अशी चर्चा करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिल होत. अंकिताने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होत, “मी माझ्याविषयी सुरु असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आहे. मला जितकं पारदर्शी राहता येईल तितकं मी राहते. हे आहेत माझ्या घराच्या नोंदणीची कागदपत्रं आणि माझ्या बँक खात्याचे विवरण (1 जानेवारी 2019 ते 1 मार्चा 2020 पर्यंत). यात माझ्या खात्यातून प्रत्येक महिन्याला घराचा ईएमआय म्हणून कपात होणाऱ्या रकमेला मी अधोरेखित केलं आहे. यापेक्षा अधिक माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही.

संबंधित बातम्या : 

‘आम्ही एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता’, अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीचा दावा खोडला

Sushant Singh Rajput | रियाने सुशांतला खूप त्रास दिला, अंकिता लोखंडेचा धक्कादायक जबाब, व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा दाखला

(Sushant’s fans angry over Ankita Lokhande, dancing to ‘Bang Bang’ song with boyfriend)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.