घराचा हप्ता सुशांत भरत असल्याचा आरोप, अभिनेत्री अंकिता लोखंडेने घराची आणि बँकेची कागदपत्रे दाखवली

अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकतेच सोशल मीडियावर आपल्या घराची कागदपत्रं शेअर केली (Ankita Lokhande on Sushant Singh Suicide Case).

घराचा हप्ता सुशांत भरत असल्याचा आरोप, अभिनेत्री अंकिता लोखंडेने घराची आणि बँकेची कागदपत्रे दाखवली

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकतेच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत आपल्या मालाड येथील फ्लॅटची काही माहिती शेअर केली (Ankita Lokhande on Sushant Singh Suicide Case). अंकिताने आपल्या फ्लॅटच्या नोंदणीची प्रत आणि बँक विवरणाचा फोटो पोस्ट केला. अंकिताच्या या पोस्टवर सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. यात तिने अंकिताला पाठिंबा देताना तिचं कौतुक केलं.

अंकिताने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “मी माझ्याविषयी सुरु असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आहे. मला जितकं पारदर्शी राहता येईल तितकं मी राहते आहे. हे आहेत माझ्या घराच्या नोंदणीची कागदपत्रं आणि माझ्या बँक खात्याचे विवरण (1 जानेवारी 2019 ते 1 मार्चा 2020 पर्यंत). यात माझ्या खात्यातून प्रत्येक महिन्याला घराचा ईएमआय म्हणून कपात होणाऱ्या रकमेला मी अधोरेखित केलं आहे. यापेक्षा अधिक माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही. #justiceforssr.”

अंकिताच्या या पोस्टवर सुशांतची बहीण श्वेताने म्हटलं, “तू एक स्वतंत्र मुलगी आहे. मला तुझा अभिमान आहे. श्वेताशिवाय इतर अनेक सेलिब्रेटिंनी देखील अंकिताच्या या इन्स्टा पोस्टवर कमेंट केली आहे. अॅक्टर महेश शेट्टीने म्हटलं, “अंकिता तुला स्पष्टीकरण देण्याची कोणतीही गरज नाही. आम्हाला तुझा अभिमान आहे.”

शुक्रवारी (14 ऑगस्ट) अभिनेत्री आणि सुशांतची एकेकाळची प्रेयसी अंकिता लोखंडे ज्या घरात राहते त्याच्या कर्जाचा हप्ता सुशांत सिंह भरत होता, अशी चर्चा होती. त्यालाच उत्तर म्हणून अंकिताने आपल्या फ्लॅटची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. तसेच अशी चर्चा करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर आता बॉलिवूडमधूनही सीबीआय चौकशीची मागणी होऊ लागली आहे (Varun Dhawan and Suraj Pancholi on Sushant Singh Suicide). अभिनेता वरुण धवन आणि सुरज पांचोली यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केलीय. तसेच सुशांतच्या मृत्यूविषयीचं खरं जगाला जाणून घ्यायचं आहे. सुशांतला न्याय मिळायला हवा, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुरज पांचोलीने आपल्या  इन्स्टा स्टोरीमध्ये खरं जगाला जाणून घ्यायचं आहे. सूशांतला न्याय मिळायला हवं, असं मत व्यक्त केलं. तर वरुण धवनने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये #cbiforsushant असा हॅशटॅग वापरत सीबीआय चौकशीला पाठिंबा दिला. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर अनेकदा #justiceforsushantsingrajput हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. यात बॉलिवूडमधील अनेक मोठी नावंही व्यक्त होत आहेत.

संबंधित बातम्या :

‘सुशांत सिंह प्रकरणी खरं जगाला जाणून घ्यायचंय’, बॉलिवूडमधूनही सीबीआय चौकशीची मागणी

Sushant Singh Rajput | मनी लाँड्रिंग प्रकरण, ईडीकडून सुशांतचे कुटुंबीय, बॉडीगार्ड आणि नोकरांची चौकशी होणार

बहिणीला टीमची जबाबदारी ते हॉलिवूड पदार्पण, सुशांतच्या डायरीत 2020 चे प्लानिंग

Ankita Lokhande on Sushant Singh Suicide Case

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *