'सुशांत सिंह प्रकरणी खरं जगाला जाणून घ्यायचंय', बॉलिवूडमधूनही सीबीआय चौकशीची मागणी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर आता बॉलिवूडमधूनही सीबीआय चौकशीची मागणी होऊ लागली आहे (Varun Dhawan and Suraj Pancholi on Sushant Singh Suicide).

'सुशांत सिंह प्रकरणी खरं जगाला जाणून घ्यायचंय', बॉलिवूडमधूनही सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर आता बॉलिवूडमधूनही सीबीआय चौकशीची मागणी होऊ लागली आहे (Varun Dhawan and Suraj Pancholi on Sushant Singh Suicide). अभिनेता वरुण धवन आणि सुरज पांचोली यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तसेच सुशांतच्या मृत्यूविषयीचं खरं जगाला जाणून घ्यायचं आहे. सुशांतला न्याय मिळायला हवा, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुरज पांचोलीने आपल्या  इन्स्टा स्टोरीमध्ये खरं जगाला जाणून घ्यायचं आहे. सूशांतला न्याय मिळायला हवं, असं मत व्यक्त केलं. तर वरुण धवनने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये #cbiforsushant असा हॅशटॅग वापरत सीबीआय चौकशीला पाठिंबा दिला. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर अनेकदा #justiceforsushantsingrajput हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. यात बॉलिवूडमधील अनेक मोठी नावंही व्यक्त होत आहेत.

अभिनेत्री परिणीती चोप्राने देखील इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सत्य बाहेर यायला हवं. सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळायला हवा, असं म्हटलं. यावेळी तिने #JusticeForSSR असा हॅशटॅग वापरला.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मनी लाँड्रिंग प्रकरणात सुशांतच्या कुटुंबातील (Sushant Singh Rajput Bodyguard Inquiry) व्यक्तींप्रमाणेच त्याच्या नोकरांचीही चौकशी होत आहे. ईडीकडून सुशांतच्या बॉडीगार्डचीही चौकशी होत आहे. पुढील आठवड्यात त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचीही चौकशी होणार आहे. कुटुंबाकडे आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी केली जाणार आहे.

याआधी ईडीने या प्रकरणी रिया चकरवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि भाऊ शौविक चक्रवर्ती त्याचप्रमाणे श्रुती मोदी, सॅम्युअल मिरांडा यांची चौकशी केली आहे.

यानंतर आता तक्रारदार कुटुंबातील व्यक्तींची चौकशी करणार असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी निश्चित केलं आहे. आधीच सुशांतची बहीण मितू सिंह हिची चौकशी झाली आहे. यानंतर सुशांतचे वडील के. के. सिंह, बहीण प्रियांका आणि राणी यांचीही चौकशी होणार आहे. पुढील आठवड्यात ही चौकशी होणार आहे (Sushant Singh Rajput Bodyguard Inquiry).

आज (14 ऑगस्ट) सुशांतचे नोकर दीपेश सावंत आणि केशव बचनेर यांची चौकशी होणार आहे. खरंतर आधी सुशांतचा बॉडीगार्ड रेनॉल्डला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र,तो काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही. तोही आज चौकशीसाठी हजर राहणार आहे.

रियावर 15 कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार केल्याचा आरोप

ईडीने सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यावरुन झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहार प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर 15 कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचाही या चौकशी तपास केला जात आहे. याचाच भाग म्हणून रिया आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी केली. त्यानंतर आता सुशांतच्या कुटुंबियांचीही चौकशी केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

… तर मी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी माफी मागेन : संजय राऊत

Sushant Death Case | बिहार निवडणुकांमुळे सुशांतच्या मृत्यूचे राजकारण, महाराष्ट्राचा दावा, तिवारी क्वारंटाईन प्रकरणही गाजले, सुप्रीम कोर्टात काय काय झाले?

रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मीडिया ट्रायल थांबवण्याची रियाची मागणी

Varun Dhawan and Suraj Pancholi on Sushant Singh Suicide

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *