Sushant Singh Rajput | मनी लाँड्रिंग प्रकरण, ईडीकडून सुशांतचे कुटुंबीय, बॉडीगार्ड आणि नोकरांची चौकशी होणार

मनी लाँड्रिंग प्रकरणात आता सुशांतच्या कुटुंबातील व्यक्तींची त्याचप्रमाणे त्याच्या नोकरांची चौकशी होणार आहे.

Sushant Singh Rajput | मनी लाँड्रिंग प्रकरण, ईडीकडून सुशांतचे कुटुंबीय, बॉडीगार्ड आणि नोकरांची चौकशी होणार

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मनी लाँड्रिंग प्रकरणात आता सुशांतच्या कुटुंबातील (Sushant Singh Rajput Bodyguard Inquiry) व्यक्तींची त्याचप्रमाणे त्याच्या नोकरांची चौकशी होणार आहे. उद्या सुशांतच्या त्याच्या बॉडीगार्डची चौकशी होणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात त्याच्या कुटुंबातील व्यक्तींची चौकशी होणार आहे. कुटुंबाकडे आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी केली जाणार आहे (Sushant Singh Rajput Bodyguard Inquiry).

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास अजूनही सुरुच आहे. आता ईडीचा तपास सुरु आहे. ईडीने आतापर्यंत या प्रकरणातील संशयित रिया चकरवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि भाऊ शौविक चक्रवर्ती त्याचप्रमाणे श्रुती मोदी, सॅम्युअल मिरांडा यांची चौकशी केली आहे.

हेही वाचा : बहिणीला टीमची जबाबदारी ते हॉलिवूड पदार्पण, सुशांतच्या डायरीत 2020 चे प्लानिंग

यानंतर आता तक्रारदार कुटुंबातील व्यक्तींची चौकशी करणार असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी निश्चित केलं आहे. आधीच सुशांतची बहीण मितू सिंह हिची चौकशी झाली आहे. यानंतर सुशांतचे वडील के. के. सिंह, बहीण प्रियांका आणि राणी यांचीही चौकशी होणार आहे. पुढील आठवड्यात ही चौकशी होणार आहे (Sushant Singh Rajput Bodyguard Inquiry).

शुक्रवारी (14 ऑगस्ट) सुशांतचे नोकर दीपेश सावंत आणि केशव बचनेर यांची चौकशी होणार आहे. खरंतर आज सुशांतचा बॉडीगार्ड रेनॉल्डला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र,तो काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही. तो आता उद्या चौकशीसाठी हजर राहणार आहे.

रेनॉल्ड सतत सुशांत सोबत असायचा. त्यामुळे त्याला सुशांतबाबत त्याचप्रमाणे सुशांतच्या सतत आजूबाजूला असणाऱ्या लोकांबाबत माहिती आहे. हे ईडी अधिकाऱ्यांना जाणून घ्यायचं आहे. याचमुळे प्रथम रेनॉल्डला बोलावलं आहे. त्यानंतर सुशांतचे नोकर दीपेश सावंत, केशव बचनेर यांची चौकशी होणार आहे. या सर्वांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. आज काही साक्षीदार चौकशीसाठी येण्याची शक्यता होती. पण ते आले नाहीत. ते उद्या येणार आहेत. सुशांत प्रकरणाचा तपास पुढील काही दिवस असाच सुरु राहणार आहे.

रियावर 15 कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार केल्याचा आरोप

ईडीने सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यावरुन झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहार प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर 15 कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचाही या चौकशी तपास केला जात आहे. याचाच भाग म्हणून रिया आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी केली. त्यानंतर आता सुशांतच्या कुटुंबियांचीही चौकशी केली जाणार आहे.

Sushant Singh Rajput Bodyguard Inquiry

संबंधित बातम्या :

… तर मी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी माफी मागेन : संजय राऊत

Sushant Death Case | बिहार निवडणुकांमुळे सुशांतच्या मृत्यूचे राजकारण, महाराष्ट्राचा दावा, तिवारी क्वारंटाईन प्रकरणही गाजले, सुप्रीम कोर्टात काय काय झाले?

रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मीडिया ट्रायल थांबवण्याची रियाची मागणी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *