श्रीमती सुशिला भोजराज शेट्टी यांना स्नेहसंवर्धन पुरस्कार

| Updated on: Jul 12, 2019 | 2:37 PM

आंबेजोगाईतील आंतरभारती शाखेच्यावतीने दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार यंदा श्रीमती सुशिला भोजराज शेट्टी यांना जाहीर झाला.  हा पुरस्कार दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी दिला जातो.

श्रीमती सुशिला भोजराज शेट्टी यांना स्नेहसंवर्धन पुरस्कार
Follow us on

बीड : आंबेजोगाईतील आंतरभारती शाखेच्यावतीने दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार यंदा श्रीमती सुशिला भोजराज शेट्टी यांना जाहीर झाला.  हा पुरस्कार दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी दिला जातो. अन्य प्रांतातून येऊन आंबाजोगाईत स्थायिक झालेल्या आणि आंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तींचा आंतरभारती, आंबाजोगाईच्यावतीने सत्कार केला जातो.

श्रीमती शेट्टी या त्यांचे दिवंगत पती भोजराज यांच्या समवेत 60च्या दशकात आंबाजोगाई येथे येऊन स्थायिक झाल्या. पती निधनानंतरही त्यांनी आंबाजोगाई येथेच राहण्याचा निर्णय केला. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे आंतरभारती आंबाजोगाईच्या अध्यक्ष डॉ प्रा अलका वालचाळे यांनी सांगितले.

15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी  प्रमुख अतिथी म्हणून आंतरभारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमर हबीब आणि मनस्विनी महिला प्रकल्पाच्या प्रमुख डॉ अरूंधती लोहिया-पाटील उपस्थित रहाणार आहेत. परंपरेनुसार माजी सत्कारमूर्ती आनंदराव अंकम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल.

बैठकीस अमर हबीब , अलका वालचाळे, वैजनाथ शेंगुळे, मुजीब काजी, प्रा.अनंत कांबळे, आनंदराव अंकम, राजाभाऊ कुलकर्णी, अनिरूद्ध चौसाळकर, संतोष मोहिते,  अॅड. कल्याणी विर्धे,  उदय आसरडोहकर, आदी उपस्थित होते.

सहावा पुरस्कार

  1. बी वाय खडकभावी (कर्नाटक) 2014
  2. रुपडाजी (गुजरात), 2015
  3. एम बी शेट्टी (कर्नाटक), 2016
  4. शंकर जी मेहता (राजस्थान) 2017
  5. आनंदराव अंकाम (तेलंगण) 2018
  6. सुशिला भोजराज शेट्टी (कर्नाटक) 2019