टोल नाक्यावरील उर्वरित 22 कर्मचारी पुन्हा कामावर रुजू, शेकाप नगरसेवकाची कंत्राटदाराची चर्चा

शेकाप नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी पुढाकार घेत सविस्तर चर्चा केली. (Toll Worker rejoin to work after Shetkari Kamgar Party corporator meeting)  

टोल नाक्यावरील उर्वरित 22 कर्मचारी पुन्हा कामावर रुजू, शेकाप नगरसेवकाची कंत्राटदाराची चर्चा
Namrata Patil

|

Oct 13, 2020 | 1:04 PM

पनवेल : लॉकडाऊन काळात सायन पनवेल महामार्गावरील 39 कामगारांना टोल कंत्राटदाराच्या कामावरुन तडकाफडकी कमी केले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी कंत्राटदार डी. आर. सर्व्हिसेस यांच्या धोरणाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली होती. अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून त्या कंत्राटदाराने या कामगारांना पुन्हा कामावर परत घेण्याची तयारी दर्शवली आहे. (Toll Worker rejoin to work after Shetkari Kamgar Party corporator meeting)

या कर्मचाऱ्यांमध्ये अटेन्डन्स, इंचार्ज, सुपरवायझर इत्यादी पदांवर कार्यरत असलेले हे कर्मचारी आहेत. यापूर्वी याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि टोल कंत्राटदार राजकुमार ढाकणे यांची बैठकी पार पडली होती. या बैठकीत 39 पैकी 17 कामगारांना कामावर नव्याने रुजू करण्याची तयारी ढाकणे यांनी दाखविली होती.

मात्र उर्वरित 22 कामगारांचा समावेश करण्याबाबतचा प्रश्न प्रलंबित होता. त्यावर शेकाप नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी पुढाकार घेत ढाकणे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर उर्वरित 22 कामगारांना देखील टोल नाक्यावर कामावर घेण्यास डी. आर. सर्व्हिसेसचे ढाकणे यांनी तयारी दर्शवली आहे.

शुक्रवारपासून 22 कामगार कामावर रूजू झाले आहेत. गेल्या पाच महिन्यापासून घरी बसलेल्या या कामगारांवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली होती. नव्याने कामावर रूजू झाल्याने कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी यावर यशस्वी तोडगा काढल्याने कामगारांनी त्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान संबंधित 39 कामगारांना पीएफ आणि थकीत पगार मिळवून देण्यासंदर्भात देखील माझा पाठपुरावा सुरु असल्याचे नगरसेवक गायकर यांनी सांगितले. (Toll Worker rejoin to work after Shetkari Kamgar Party corporator meeting)

संबंधित बातम्या :

Maharashtra Rain | भातशेतीचं नुकसान, उदय सामंतांचे पंचनामे करण्याचे आदेश

एक्स्प्रेस वेवर गस्त घालणाऱ्या पोलिसाला ट्रकचा धक्का, जागेवरच मृत्यू

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें