Maharashtra Rain | भातशेतीचं नुकसान, उदय सामंतांचे पंचनामे करण्याचे आदेश

ओला दुष्काळ जाहीर करावा की नाही याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. मात्र, पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश उदय सामंतानी प्रशासनाला दिले आहेत.

Maharashtra Rain | भातशेतीचं नुकसान, उदय सामंतांचे पंचनामे करण्याचे आदेश

सिंधुदुर्ग/चंद्रपूर: राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे भातशेतीचे बरेच नुकसान झाले आहे. त्या संदर्भात पालकमंत्री उदय सामंतांनी सिंधुदुर्ग येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ओला दुष्काळ जाहीर करावा की नाही याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. मात्र, पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. (Uday Samant orders officers to prepare report of crop loss due to rain)

राज्य शासनाने शेतक-यांच्या नुकसानीच्या यादीची मागणी केल्यानंतर तातडीने ती सादर करता यावी यासाठी नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

चंद्रपूरमध्येही धान शेतीचं नुकसान

चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. शेवटच्या टप्प्यात काढणीला आलेल्या धान पिकाचे मुसळधार पावसाने नुकसान केले. जिल्ह्यात सुमारे चार लाख हेक्‍टर शेती योग्य जमिनीपैकी सर्वाधिक 2 लाख हेक्‍टरवर धानाची शेती केली जाते. जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य सरासरी सुमारे १४०० मिलिमीटर पावसाची असल्याने चंद्रपूर जिल्ह्याला भाताचे कोठार देखील म्हटले जाते. मात्र, गेली काही वर्षे पावसाच्या लहरीपणाचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्याला बसत आहे.

दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी होत शेतकऱ्यांना काही पैसा हाताशी येत असल्याने हा काळ शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. मात्र, जिल्ह्यातील सर्वच भागात ऐन काढणीला आलेल्या धान पिकांमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने संपूर्ण धान सडून गेले आहे. हातातोंडाशी आलेला धानशेतीचा घास निसर्गाने हिरावला असून यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. गेली काही वर्षे हे चित्र सातत्याने दिसत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी पुढे येत आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईसह 16 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

Hingoli Rain | हिंगोलीत मुसळधार पाऊस, शेतीचं नूकसान

(Uday Samant orders officers to prepare report of crop loss due to rain)

Published On - 12:00 pm, Tue, 13 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI