एक बहीण स्वीडनला, दुसरी बुधवार पेठेत, 32 वर्षांनी बहिणींची भेट

| Updated on: May 29, 2019 | 8:49 PM

पुणे : अचानक भेट होणं हा आपण योगायोग समजतो. मात्र पुण्यातल्या बुधवार पेठेत तब्बल 32 वर्षानंतर तिला तिची बहीण मिळाली आहे. सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने हा योग जुळून आला. आईचा शोध घेतला. मात्र आई मयत झाली होती. मात्र आईच्या शोधत बहीण मिळाली. नेहा ही स्वीडनमध्ये स्थायिक झालेली महिला. जिला 32 वर्षांपूर्वी स्वीडनमध्ये दत्तक देण्यात […]

एक बहीण स्वीडनला, दुसरी बुधवार पेठेत, 32 वर्षांनी बहिणींची भेट
Follow us on

पुणे : अचानक भेट होणं हा आपण योगायोग समजतो. मात्र पुण्यातल्या बुधवार पेठेत तब्बल 32 वर्षानंतर तिला तिची बहीण मिळाली आहे. सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने हा योग जुळून आला. आईचा शोध घेतला. मात्र आई मयत झाली होती. मात्र आईच्या शोधत बहीण मिळाली.

नेहा ही स्वीडनमध्ये स्थायिक झालेली महिला. जिला 32 वर्षांपूर्वी स्वीडनमध्ये दत्तक देण्यात आलं होतं. नेहाची आई ही मूळची उस्मानाबादची, मात्र पुण्यात कालौघात ती वेश्या व्यवसायात ओढली गेली. पुण्यातल्या ससून रुग्णालयात नेहाचा जन्म झाला आणि तिथूनच तिचा स्वीडनच्या एका कुटुंबीयांकडे दत्तक देण्यात आलं. नेहाला स्वीडनला नेलं तेव्हा तिला काही कळत नव्हतं. मात्र दत्तक देताना काही कागदपत्रे स्वीडनच्या कुटुंबीयांकडे देण्यात आली.

नेहाचं स्वीडनमधील नाव नेहा होलनग्राम असं आहे. नेहाच्या पतीने कॅनडातल्या एका एनजीओशी संपर्क साधत आपल्या पत्नीचं कोणी नातेवाईक जिवंत आहेत का याची माहिती घेण्यास सुरुवात केली. तिची बहीण जिवंत आहे असं समजलं आणि नेहा बुधवारी तिच्या बहिणीला भेटायला पुण्यात आली.

नेहाची बहीण ही सध्या बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करते. नेहा ही तिच्या बहिणींपेक्षा वयाने मोठी आहे. मात्र नेहाच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आता तिची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. मात्र डीएनए चाचणी करण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. ती प्रक्रीया आता पूर्ण केली जाणार आहे. नेहा ही सध्या सहा दिवसांसाठी पुण्यात आहे. तिच्या डीएनए चाचणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन ती स्वीडनला परत जाणार आहे.

32 वर्षांनी आपली बहीण मिळाल्याचा नेहाला आनंद आहे. नेहाच्या भेटीत पौर्णिमा गोसावी यांचा मोठा हातभार आहे. कारण पौर्णिमा गोसावी यांच्यामुळेच नेहाला स्वीडनवरुन पुण्यातली तिची बहीण मिळाली. मात्र आता डीएनएची चाचणी कशी होते आणि त्यांचा डीएनए जुळून येतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मला माझी बहीण मिळाली याचा आनंद आहे. असं कोणाच्या बाबतीत होऊ नये,  असं नेहाची बहीण सांगते. नियतीचा खेळ वेगळा असतो. जन्म झाल्यानंतर आई कोण, वडील कोण, हे माहीत नसतं. मात्र जेव्हा माहीत होतं तेव्हा सर्व शोध सुरू होतो आणि कधी न पाहिलेल्या बहिणी गळ्यात पडून भेटतात.