विनायक राऊत सूनेच्या आरोपाने भडकले, लवकरच मोठा बॉम्ब फोडणार; म्हणाले, षडयंत्रामागील सूत्रधार…
vinayak raut news : विनायक राऊत यांनी सूनेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. या षडयंत्रामागे सूत्रधार असल्याचाही आरोप केला.

गिरीजा राऊत यांच्या आरोपाने विनायक राऊत यांचं कुटुंब अडचणीत सापडलं आहे. मागील अनेक दिवसांपासून गिरीजा राऊत या विनायक राऊतांच्या कुटुंबावर आरोप करत आहेत. त्यात काल ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राऊत कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. परंतु गिरीजा राऊतांच्या आरोप करण्यामागे षडयंत्र आहे. या षडयंत्रामागे सूत्रधार कोण? हे लवकरच समोर येईल, असा पलटवार विनायक राऊत यांनी केला आहे. विनायक राऊतांचा नेमका कुणावर नेम होता, येत्या दिवसांत स्पष्ट होईल.
कोर्टात आज गितेश राऊत प्रकरणाची सुनावणी होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जुलै रोजी होणार आहे. या प्रकरणावर विनायक राऊत यांनी म्हटलं की, ‘थ्री बेडरूमचा घर मागितला. ईएमआय मी भरणार नाही. तुम्हीच भरा. या सर्व डिमांड पूर्ण करण्यासाठी त्यांनी आरोप केलाय. आम्ही आरोपाला भीक घालत नाही. आम्ही अध्यात्मिक आहोत. पंढरपूरचा पांडुरंग आणि बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. कुलदेवतेला गावाला जाणं हा काही गुन्हा नाही’.
‘माझा पोलीस खात्यावर विश्वास आहे. न्यायालयावर विश्वास आहे. त्यांनी ज्यांची नावे दिली आहे. त्यांची चौकशी करेल तेव्हा सर्व समोर येईल. मला यांच्या बकवासगिरीवर विश्वास नाही. पोलीसांच्या चौकशीवर विश्वास आहे. आमचे सर्वात ज्येष्ठ बंधू आहेत. ते भांडूपला राहतात. त्यांचं मार्गदर्शन घेणं हे आमचं कर्तव्य आहे. आमच्या ज्येष्ठांना आम्ही सन्मानाने वागवतो. गिरीजाने सुरुवातीला १२ कोटी मागणी केली. वकील जे सांगतील ते करू. कोर्ट जेव्हा बोलवले तेव्हा आम्ही कोर्टात हजर राहू,असे विनायक राऊत म्हणाले.
‘मी आजच्या पीसीत षडयंत्राचा पुरावा देणार नाही. पण जे षडयंत्र रचलं जातं, त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाचा आहे हे नंतर सांगेल. आमचं संरक्षण गेल्या महिन्यातच काढलं आहे. मागणी करून दिलं नाही. या मागे षडयंत्र आहे. आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. यातून आम्ही बाहेर पडू. पोलिसांना चौकशी करावी, आमची ना नाही. पोलीस जेव्हा जेव्हा बोलावतील तेव्हा तेव्हा आम्ही हजर राहू. आमचे किती प्रकरणे येतील ते येतील. त्यांचे बाकी काही धंदेच नाहीये, असे विनायक राऊत यांनी पुढे सांगितले.