आता सगळं संपलं असं हवामान खाते सांगत नाही, तोपर्यंत पंचनामे नाही : अब्दुल सत्तार

| Updated on: Oct 19, 2020 | 4:16 PM

अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

आता सगळं संपलं असं हवामान खाते सांगत नाही, तोपर्यंत पंचनामे नाही : अब्दुल सत्तार
Follow us on

जालना : अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. काही ठिकाणी पंचनामे सुरु आहेत. पंचनामे आणि नुकसान भरपाईबाबत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (Until the weather department says it’s all over, there is no inspection, says Abdul Sattar)

आतापर्यंत तीनवेळा पंचनामे करण्यात आले आहेत. जोपर्यंत हवामान खाते आता सगळे संपले असे सांगत नाही तोपर्यंत पंचनामे होणार नाहीत. एकदा पंचनामे झाले की शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत करू, असे वक्तव्य महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना केले आहे.

राज्यातील ज्या भागात पावसामुळे जास्त नुकसान झालं आहे त्या भागातील महसूल वसुली थांबवण्याचे आदेश देणार असल्याचेही महसूल राज्यमंत्र्यांनी सांगितले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत नुकसानाची भरपाई मिळणार आहे. वेळप्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करु. असे आश्वासनदेखील सत्तार यांनी यावेळी दिलं आहे.

विरोधक ज्या ताकदीने राज्य सरकारवर टीका करतंय तेवढीच ताकद त्यांनी केंद्राकडून राज्याला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी वापरावी, असा टोलाही त्यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. सत्तार यांनी आज जालना तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या कुंभेफळ, अंतरवाला, भागात जाऊन कपाशी आणि सोयाबीन पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला

विरोधकांनी राज्याची आर्थिक परिस्थिती खराब करून ठेवली आहे. त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्यासाठी मंत्री दौरे करत आहेत. विरोधकांनी केंद्रात वजन वापरून महाराष्ट्राला मदत करायला हवी, तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी विरोधकांचाही सिंहाचा वाटा असायला हवा, असा टोलाही सत्तार यांनी भाजप नेत्यांना लगावला.

बाळासाहेबांचे वारस असल्याचे सिद्ध करा अन्यथा खुर्ची सोडा, अशी टीका करणाऱ्या विनायक मेटे यांचाही सत्तार यांनी यावेळी समाचार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राचं कोणतंही सहकार्य नसताना राज्यात सक्षमपणे सरकार चालवले, तेच बाळासाहेबांचे वारसदार आहेत, हे मेटे यांना कळत नाही? असा सवाल सत्तार यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल; मुख्यमंत्र्यांनी दिला आपत्तीग्रस्तांना धीर

बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा : उद्धव ठाकरे

(Until the weather department says it’s all over, there is no inspection, says Abdul Sattar)