Marathi News Latest news Us election results 2020 live updates president elect joe biden and kamala harris first speech
PHOTO: अमेरिकेत लोकशाहीच्या नव्या अध्यायाची सुरुवात
तब्बल तीन दिवस सुरु असलेल्या मतमोजणीनंतर अध्यक्षीय निवडणुकीत बाजी मारणाऱ्या जो बायडन यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी अमेरिकन जनतेला पहिल्यांदाच संबोधित केले. | US Election Results 2020
यावेळी अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेंट कमला हॅरिस यादेखील उपस्थित होत्या.
तब्बल तीन दिवस सुरु असलेल्या मतमोजणीनंतर अध्यक्षीय निवडणुकीत बाजी मारणाऱ्या जो बायडन यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी अमेरिकन जनतेला पहिल्यांदाच संबोधित केले.
आपल्या पहिल्याच भाषणात बायडन यांनी ट्रम्प समर्थकांना भावनिक साद घातली.
या निवडणुकीत ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान केले होते, त्यांची निराशा मी समजू शकतो. आता आपण एकमेकांना नवी संधी देऊयात. आता एकमेकांविषयी आरोप-प्रत्यारोप करण्याचे थांबवायला पाहिजे, वातावरणातील तणाव कमी झाला पाहिजे आणि आपण एकमेकांना नव्या नजरेतून बघायला हवे, असे आवाहन जो बायडन यांनी केले.
यावेळी अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेंट कमला हॅरिस यादेखील उपस्थित होत्या.
डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षापदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे.
20 ऑक्टोबर 1964 रोजी कॅलिफोर्नियाच्या ऑकलंडमध्ये कमला हॅरिस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे आफ्रिकेचे असून आई श्यामला गोपालन भारतीय आहेत.
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी एकाचवेळी अनेक विक्रम केले आहेत. त्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्षा, पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन आणि पहिल्या आशियायी अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षा ठरल्या आहेत.
जो बायडन (Joe Biden) या निवडणुकीत 279 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघे 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.