‘इथे फक्त 15 हजार, तिथे 1 लाख नागरिकांकडून स्वागत’, अमेरिकेतील रॅलीत ट्रम्प यांना भारत दौऱ्याची आठवण

| Updated on: Mar 01, 2020 | 4:27 PM

डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या देशात परत जाऊनही भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आदरातिथ्य विसरलेले नाहीत.

इथे फक्त 15 हजार, तिथे 1 लाख नागरिकांकडून स्वागत, अमेरिकेतील रॅलीत ट्रम्प यांना भारत दौऱ्याची आठवण
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकततेच भारत (Donald Trump Remember India Visit) दौऱ्यावर आले होते. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या देशात परत जाऊनही भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आदरातिथ्य विसरलेले नाहीत. अमेरिकेत शनिवारी एका रॅली दरम्यान त्यांनी भारताचं कौतुक करत म्हटलं, “इथे फक्त 15 हजार लोक जमले आहेत, भारतात माझ्या स्वागतासाठी एक लाखापेक्षा जास्त लोक आले होते.”

दक्षिण कॅरोलाईनामध्ये शनिवारी एका रॅली दरम्यान (Donald Trump Remember India Visit) डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मला हे बोलताना संकोच होतो आहे की, भारतात 1,29,000 क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये इतके लोक जमले होते. तुम्ही लोकांनी पाहिलं का? पूर्ण स्टेडियम भरलं होतं. जवळपास एक लाख लोक तिथे आले होते. तो एक क्रिकेट स्टेडियम होता, इथल्यापेक्षा तीनपट मोठा स्टेडियम होता”.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही तोंडभरुन कौतुक केलं. “ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) महान व्यक्ती आहेत. भारताचे लोक त्यांच्यावर खूप प्रेम करतात”. दक्षिण कॅरोलाईमध्ये रॅलीमधील लोकांबद्दल ट्रम्प म्हणाले, “इथेही चांगली गर्दी जमली आहे आणि मला गर्दी बद्दल बोलायला आवडतं. कारण माझ्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. 50 ते 60 हजार लोकांची जागा असलेल्या या ठिकाणी फक्त 15 हजार लोक आले आहेत. भारतात सव्वा अरब लोकसंख्या आहे आणि इथे 35 कोटी लोक राहतात. मी हे सांगू इच्छितो की इथे उपस्थित लोकही मला आवडतात आणि तिथले (भारत) लोकही मला आवडले.”

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. यादरम्यान, मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीच्या एका सरकारी शाळेला भेट दिली. शाळेत मेलानिया ट्रम्प यांचं ज्याप्रकारे स्वागत झालं, त्याने त्या भारावून गेल्या. त्यानंतर मेलानिया ट्रम्प यांनी भारताचं कौतुक करत अनेक ट्वीट केले. गेल्या गुरुवारी त्यांनी दिल्लीतील शाळेतील स्वागताचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. तसेच, सर्वोदय शाळेतील काही फोटोही शेअर केले.

मेलानिया यांनी ट्वीटमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. “राष्ट्रपती भवनातील स्वागतासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रथम महिला सविता कोविंद यांचे आभार. दोन्ही देशातील वाढत्या संबंधांसाठी हा एक चांगला दिवस ठरला”. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद दिले. “माझ्या आणि पोटसच्या (प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स) स्वागतासाठी थँक्यू नरेंद्र मोदी”, (Donald Trump Remember India Visit)असं ट्वीट त्यांनी केलं.