Muthiah Muralidaran | श्रीलंकेच्या फिरकीपटूवर बायोपिक, ‘हा’ अभिनेता ‘मुथय्या मुरलीधरन’च्या भूमिकेत!

| Updated on: Oct 08, 2020 | 3:59 PM

श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muthiah Muralidaran) यांच्या जीवनावर चित्रपट बनणार आहे. तमिळ सुपरस्टार विजय सेथुपती (Vijay Sethupathi) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.

Muthiah Muralidaran | श्रीलंकेच्या फिरकीपटूवर बायोपिक, हा अभिनेता ‘मुथय्या मुरलीधरन’च्या भूमिकेत!
Follow us on

मुंबई : श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muthiah Muralidaran) यांच्या जीवनावर चित्रपट बनणार आहे. तमिळ सुपरस्टार विजय सेथुपती (Vijay Sethupathi) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ‘मुथय्या मुरलीधरन’च्या बायोपिकची चर्चा सुरू होती. चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणादेखील करण्यात येणार आहे. (Vijay Sethupathi’s Muthiah Muralidaran biopic announced)

चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला आणि चित्रपट समीक्षक सेथुपती आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही बातमी शेअर केली आहे. रमेश बाला यांनी ट्विट करत लिहिले की, ‘विजय सेथुपती आता मुथय्या मुरलीधरनच्या अवतारात दिसणार आहे’. याच वृत्ताला दुजोरा देणारे ट्विट तराण आदर्श यांनी देखील केले आहे.

चित्रपटाची घोषणा होताच प्रेक्षकांनी अभिनेता विजय सेथुपतीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. या ट्विटवर दोघांचेही चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या बायोपिकची निर्मिती तमिळ भाषेत होणार असून, जगभरातील इतर भाषांमध्ये या चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. (Vijay Sethupathi’s Muthiah Muralidaran biopic announced)

दक्षिणात्य अभिनेता विजय सेथुपती याचा चाहता वर्ग मोठा असून, या चित्रपटाच्या घोषणेनंतर सगळ्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना महामारी काळात सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना, या बातमीने दक्षिणेत मात्र काहीसे आनंदाचे वातावरण तयार केले आहे.

मुथय्या मुरलीधरनचे भारताशी खास नाते

श्रीलंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला (Muthiah Muralidaran) ‘विकेट्सचा बादशाह’ म्हणून देखील ओळखले जाते. 1992मध्ये त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली होती. तब्बल 19वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात त्याच्या नावाची चर्चा होती. जुलै 2010मध्ये त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने शेवटचा सामानादेखील भारताविरुद्ध खेळला होता. शेवटच्या सामन्यात प्रज्ञान ओझाची विकेट घेत, त्याने आपल्या 800 विकेट्स पूर्ण केल्या.

श्रीलंकेचा फिरकीपटू भारताचा जावईसुद्धा आहे. मुथय्या मुरलीधरनने 2005मध्ये चेन्नईच्या माधीमलार राममूर्ती हिच्याशी विवाह केला होता. सध्या मुथय्या मुरलीधरन आयपीलच्या हैद्राबाद सनरायझर्स टीमच्या प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळत आहे.

(Vijay Sethupathi’s Muthiah Muralidaran biopic announced)