सौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग

| Updated on: Sep 16, 2020 | 1:22 PM

निखिल सोमनाथे या नववीतील विद्यार्थ्याने अवघ्या 30 दिवसात सौर ऊर्जेवर चालणारी लिटील कार बनवली आहे. (Wardha Solar Car made by School student)

सौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग
Follow us on

वर्धा : वर्ध्यात एका 15 वर्षीय मुलाने लॉकडाऊनमध्ये भन्नाट काम केलं आहे. निखिल सोमनाथे या नववीतील विद्यार्थ्याने अवघ्या 30 दिवसात सौर ऊर्जेवर चालणारी लिटील कार बनवली आहे. लॉकडाऊनच्या काळात वेळ घालवत मनातील संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत या चिमुकल्याने ही कार बनवली. अवघ्या 30 दिवसात ही कार तयार केली असून आता ही कार रस्त्यावर धावायलाही लागली आहे. ( Wardha Solar Car made by School student)

कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन होता, अशा परिस्थितीत निखिलने वेळ घालवण्यासाठी स्वत:चीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. ही कार बनविण्यासाठी सर्व साहित्य त्याने सायकलच्या दुकानातून आणले. लहान सायकलच्या चाकाच्या साहाय्याने लोखंडी रॉड, लाकडी प्लायवूड ,बॅटरी,जुन्या चार चाकी गाडीचे स्टिअरिंग अशा वस्तूंचा वापर करत त्याने ही कार बनवली आहे.

या कारचे अनेक फायदे असल्याचे निखिलने सांगितले. निखिलने बनवलेली ही कार पूर्णत: प्रदूषण मुक्त आहे. ही कार बनवण्यासाठी 20 हजार रुपये खर्च आला. ही कार एकूण 100 किलोपर्यंत वजन वाहू शकते. या कारमध्ये सोलर पॅनलचा उपयोग केला आहे. या सोलर पॅनलच्या सहाय्याने ही कार चार्ज होऊ शकते. कारची बॅटरी संपत असल्यास रनिंगमध्ये तिला बॅकअप मिळत राहतो. ( Wardha Solar Car made by School student)

महत्वाचे म्हणजे निखिलला लहानपणापासूनच अशी उपकरणे बनवण्याचा छंद आहे. त्याने आतापर्यंत आर.सी. रिमोट कंट्रोलर मोटर बोर्ड, रिमोट कंट्रोल ड्रोन, पेरणी यंत्र ,सोलर कुलर अशी यंत्रं बनवली आहेत. आता निखिलने केलेला लिटिल कारचा प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेतोय, पेट्रोल डिझेलला उत्तम पर्याय ठरलेली ही कार आर्षणाचा केंद्र बनली आहे.

संबंधित बातम्या 

Malad Accident | मालाडच्या मालवणीत लहान मुलगा कार खाली येता येता बचावला, कार चालकाचा तपास सुरु