कोण आहेत कमलनाथ?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली आहे. मध्य प्रदेशातील आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेता म्हणून कमलनाथ यांची निवड केली. त्यानंतर काँग्रेसकडून अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असतील. कोण आहेत कमलनाथ? विद्यमान मध्य प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचं शिक्षण दून स्कूलमध्ये झालं. 1980 मध्ये पहिल्यांदा खासदार […]

कोण आहेत कमलनाथ?
Follow us on

कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली आहे. मध्य प्रदेशातील आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेता म्हणून कमलनाथ यांची निवड केली. त्यानंतर काँग्रेसकडून अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असतील.

कोण आहेत कमलनाथ?

विद्यमान मध्य प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचं शिक्षण दून स्कूलमध्ये झालं. 1980 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. मध्य प्रदेशातील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून ते आतापर्यंत तब्बल आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

मे 1996 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हवाला प्रकरणात कमलनाथ यांचं नाव आल्याने निवडणूक लढता आली नाही. या परिस्थितीमध्ये त्यांच्य पत्नी अलका कमलनाथ यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्या. 1997 च्या पोटनिवडणुकीत कमलनाथ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्याविरुद्ध लढले मात्र, या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

वाचा : कमलनाथ मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, भोपालमध्ये घोषणा

कमलनाथ पहिल्यांदा 1991 साली वन आणि पर्यावरण मंत्री बनले. त्यांनी वस्त्रोद्योग राज्यमंत्री, केंद्रीय उद्योग मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री, शहर विकास मंत्री, संसदीय कामकाज मंत्री अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

कमलनाथ यांच्यावर सहा महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती आणि त्यांनी ती यशस्वीपणे पेलली. 15 वर्षांपासून मध्य प्रदेशात वनवासात असलेल्या काँग्रेसला त्यांनी अच्छे दिन आणले. कमलनाथ यांना प्रत्येक वर्गात मानलं जातं.