अक्षय कुमारने 500 कोटींचा दावा ठोकलेल्या युट्यूबरची कहानी, खोट्या बातम्या पसरवून कमवले ‘इतके’ पैसे

| Updated on: Nov 19, 2020 | 9:40 PM

यूट्यूबर राशिद सिद्दीकी हा 25 वर्षांचा आहे. तो बिहारला वास्तव्यास असून पेशाने तो सिव्हिल इंजिनिअर आहे (Youtuber Rashid Siddiqui spread rumours about Akshay Kamar).

अक्षय कुमारने 500 कोटींचा दावा ठोकलेल्या युट्यूबरची कहानी, खोट्या बातम्या पसरवून कमवले इतके पैसे
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) बिहारच्या एका यूट्यूबरविरोधात 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. अक्षयच्या या कारवाईनंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. यू्ट्यूबरने नेमकं असं काय सांगितलं असेल की ज्यामुळे अक्षय कुमारला इतक्या मोठ्या रकमेचा मानहानीचा दावा ठोकावा लागला असेल, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे (Youtuber Rashid Siddiqui spread rumours about Akshay Kamar).

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात खोटे आरोप केल्याप्रकरणी अक्षय कुमारने राशिद सिद्दीकी (Rashid Siddiqui) या यूट्यूबरविरोधात कारवाई केली आहे. राशिद सिद्दीकी याचं यूट्यूबवर ‘FF News’ नावाचं चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलवर त्याने मुंबई पोलीस, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि अक्षय कुमार यांच्याविरोधात चुकीची माहिती टाकली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित अनेक व्हिडीओ त्याने चॅनलवर टाकले आहेत. या व्हिडीओंमध्ये मुंबई पोलीस आणि अक्षय कुमार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

राशिद सिद्दीकी कोण आहे?

यूट्यूबर राशिद सिद्दीकी हा 25 वर्षांचा आहे. तो बिहारला वास्तव्यास असून पेशाने तो सिव्हिल इंजिनिअर आहे. त्याने यूट्यूबवर FF NEWS नावाचं चॅनल सुरु केलं आहे. या यूट्यूब चॅनलवर त्याने शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये मुंबई पोलीस, अक्षय कुमार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात चुकीची माहिती दिली आहे.

राशिदचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे वकील धर्मेंद्र मिश्रा यांनी त्याची गंभीर दखल घेत कारवाई केली. त्यांनी राशिदविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राशिद विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, कोर्टाने राशिदला पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.

राशिदने यूट्यूबवर 2016 सालापासून अकाउंट बनवलं आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून त्याच्या चॅनलला फारसे सब्सक्रायबर्स नव्हते. पण गेल्या काही महिन्यात राशिदच्या यूट्यूब चॅनलवर सब्सक्रायबर्सची संख्या झपाट्याने वाढली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राजकारण सुरु होतं, त्याचाच फायदा घेत राशिदने याप्रकरणाशी संबंधित खोट्या बातम्या देत सब्सक्रायबर्सची संख्या वाढवली.

राशिदच्या यू्ट्यूब चॅनलवर वादग्रस्त विषयांवर व्हिडीओ

राशिदच्या यूच्यूब चॅनलवर पहिला व्हिडीओ 2017 साली अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ फक्त 17 सेकंदाचा होता. राशिदच्या चॅनलवर सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ हा आदित्य ठाकरे यांच्याशी संबंधित आहे. हा व्हिडीओ जवळपास 12 लाख लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओत सुशांत प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा कसा संबंध आहे, असं सांगण्यात आलं आहे.

राशिदच्या चॅनलवर जितके व्हिडीओ सर्वाधिक पाहिले गेले त्यामधील अनेक व्हिडीओंचा कालावधी हा तीन मिनिटापेक्षा कमी आहे. त्याच्या चॅनलवर मुव्ही रिव्ह्यूदेखील आहेत. पण ते व्हिडीओ बघताना आपण चित्रपटांची समीक्षा बघतोय हे जाणवत नाही (Youtuber Rashid Siddiqui spread rumours about Akshay Kamar).

राशिदने आपल्या यूट्यूब चॅनलवर अनेक वादग्रस्त विषयांशी संबंधित व्हिडीओ अपलोड केले आहेत. मग तो विषय सुशांत केसशी संबंधित असो किंवा पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा असो, त्याने अभिनेत्री कंगना रनौतच्या ट्विटबाबतही व्हिडीओ अपलोड केले आहेत. त्याने व्हिडीओंमध्ये सांगितलेल्या गोष्टींमध्ये काहीच तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

अवघ्या काही महिन्यात तीनपट फॉलोअर्स वाढवले

राशिदने यूट्यूबवर सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित खोटी माहिती पसरवून बक्कड पैसा कमवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. त्याने सुशांत प्रकरणाचा वापर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला. राशिदच्या यूट्यूब चॅनलवरच्या सब्सक्रायबर्सची संख्या अवघ्या काही महिन्यात 1 लाखावरुन 3.70 लाखांवर पोहोचली. विशेष म्हणजे मे 2020 मध्ये या यूट्यूब चॅनलवर त्याने 296 रुपये कमवले होते. पण सप्टेंबरमध्ये त्याने यूट्यूब चॅनलवर तब्बल 6 लाख 50 हजार 898 रुपये कमवले.

राशिद अक्षय कुमारबाबत नेमकं काय म्हणाला होता?

“अक्षय कुमार सुशांत सिंह राजपूतला एम. एस. धोनीसारखे मोठे चित्रपट मिळाल्याने खूश नव्हता. अक्षय कुमारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांसोबत गुप्त बैठक केली होती. तसेच अक्षय कुमारने रिया चक्रवर्तीला कॅनडाला जाण्यासाठी मदत केली होती”, असं राशिद त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला होता.

संबंधित बातमी :

सुशांत आत्महत्येप्रकरणी ‘खिलाडी’वर गंभीर आरोप, यूट्यूबरविरोधात अक्षय कुमारचा 500 कोटींचा दावा