AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाड आणि लांब केसांसाठी कांद्याच्या रसात ‘या’ 2 गोष्टी करा मिक्स, काही दिवसांत दिसून येईल परिणाम

आजकाल प्रत्येकालाच केस गळण्याच्या समस्या सतावत आहेत. यासाठी अनेकजण घरगुती उपाय करतात. यामध्ये कांद्याचा रस हा प्रभावी उपाय मानला जातो. अशातच कांद्याचा रस केसांना लावल्याने केसांची वाढ जलद होते. तर कांद्यांच्या रसात तुम्ही जर या दोन गोष्टी मिक्स केल्यातर तुम्हाला जाड केसांनसह केसांची वाढ देखील होत राहील. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

जाड आणि लांब केसांसाठी कांद्याच्या रसात 'या' 2 गोष्टी करा मिक्स, काही दिवसांत दिसून येईल परिणाम
Long HairImage Credit source: Sonja Pacho/The Image Bank/Getty Images
| Edited By: Sanjay patil | Updated on: May 30, 2025 | 1:40 AM
Share

आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनहेल्दी जीवनशैली, वाढते वय, ताणतणाव हे यामागची अनेक कारणे आहेत. जर केस गळती कमी झाली नाही तर ती चिंतेचे कारण बनू शकते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी बहुतेकजण बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक प्रोडक्टचा वापर करतात परंतु त्यामध्ये कॅमिकलचा धोका असतो. अशा परिस्थितीत फायद्याऐवजी केसांचे मोठे नुकसान होते. त्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करून पाहता येतात. केसांची काळजी घेताना घरगुत‍ी उपाय करताना कांदा देखील लगेच लक्षात येतो. नैसर्गिकरित्या पौष्टिक असण्याव्यतिरिक्त, त्याचा रस केसांना लावल्याने केस मऊ करणे यासारखे अनेक फायदे मिळत असतात.

कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळतीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. कारण कांद्यामध्ये काही पोषक घटक असतात जे स्कॅल्प निरोगी ठेवण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया कांद्याचा रस केसांसाठी कसा वापरता येईल.

कांद्याच्या रसाने बनवा हेअर मास्क

कांद्याचा रस आणि कोरफड जेल

कोरफड आणि कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांना रेशमी आणि गुळगुळीत बनवतातच, शिवाय त्यांच्या वाढीसही मदत करतात. हे हेअर मास्क बनवण्यासाठी, कोरफड जेलमध्ये कांद्याचा रस टाकून मिक्स करा. आता हे मिश्रण केसांच्या मुळांवर आणि स्कॅल्पवर चांगले लावा. व 30 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. तुम्ही हा हेअर मास्क आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

कांद्याचा रस आणि नारळ तेल

कांद्याच्या रसात अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतात, तर नारळाच्या तेलात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे कोंड्याची समस्या कमी करतात. तसेच तुमच्या केसांना रेशमी, चमकदार आणि गुळगुळीत बनवण्यास देखील मदत करते. तर यासाठी केसांचा हेअर मास्क करण्यासाठी, कांद्याचा रस नारळाच्या तेलात चांगले मिक्स करा आता हे मिश्रण केसांच्या मुळांवर लावा आणि 45 मिनिटांनी केस धुवा. आठवड्यातून दोनदा हा हेअरमास्क वापरल्यानंतर तुम्हाला चांगले परिणाम मिळायला सुरुवात होईल.

केसांना कांद्याचा रस लावण्याचे फायदे

कांद्याच्या रसात भरपूर सल्फर असते जे केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करते. केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळण्यास हे मदत करते. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे केसांमध्ये कोंडा आणि खाज सुटणे यासारख्या समस्यांपासून आराम देतात. कांद्याच्या रसाचा वापर केल्याने तुमचे केस लांब आणि दाट होतात.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?