AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harmful Curd Combination : दह्यासोबत ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नका, अन्यथा आरोग्य बिघडेल !

बाराही महिने दही खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोक आपल्या आहारात दही खातात.

Harmful Curd Combination : दह्यासोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका, अन्यथा आरोग्य बिघडेल !
दही
| Updated on: May 19, 2021 | 11:30 AM
Share

मुंबई : बाराही महिने दही खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोक आपल्या आहारात दही खातात. दही आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात जे पाचन तंत्राला बळकट करण्यास मदत करतात. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी -12 यासह अनेक पौष्टिक घटक असतात. (Avoid eating these foods with curd)

दह्याचे सेवन केल्याने आपली बॉडी डिटॉक्स होते. दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे. दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात.

दही आणि मासे तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी ऐकलं असेल की दही आणि मासे एकत्र खाऊ नयेत. या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने नुकसान होते. यामुळे उलट्या, अपचनाची समस्या उद्भवू शकतात.

केळी आणि दही केळी आणि दही कधीही एकत्र खाऊ नका. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते. त्याऐवजी आपण दूध आणि केळी खाऊ शकता.

दही आणि कांदा उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना या दोन्ही गोष्टी खायला आवडतात. कांदा गरम असताना दही थंड असते. या गोष्टी एकत्र खाल्ल्यामुळे अॅलर्जी, गॅस, अॅसिडिटी आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. या दोन्ही गोष्टी कधीच एकत्र खाऊ नका.

दूध आणि दही दूध आणि दही हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही दूध पीत असाल तर दही खाऊ नका आणि जर तुम्ही दही खात असाल तर दूध पिऊ नका. या दोन गोष्टी एकत्र खाऊ नयेत. यामुळे गॅस, अतिसार आणि आंबटपणाची समस्या उद्भवू शकते.

उडद डाळ आणि दही उडद डाळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण कधीही दह्यासोबत खाऊ नका. या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने पाचन तंत्रावर परिणाम होतो, ज्यामुळे पोटा संबंधित आजार होऊ शकतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Lipstick shades | तुमच्या चेहऱ्यासाठी लिपस्टिकचा कोणता रंग ठरेल सर्वोत्तम? जाणून घ्या…  

आकर्षक वनस्पतींनी खुलवा घरांची सजावट, जाणून घ्या कशी करायची देखभाल?

(Avoid eating these foods with curd)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...