Lipstick shades | तुमच्या चेहऱ्यासाठी लिपस्टिकचा कोणता रंग ठरेल सर्वोत्तम? जाणून घ्या…  

गोंधळात बर्‍याच वेळा स्त्रिया कोणतीही शेड विकत घेतात. परंतु, ओठांवर ती शेड लावल्यानंतर चेहरा निस्तेज दिसू लागतो किंवा रंग गडद दिसू लागतो.

Lipstick shades | तुमच्या चेहऱ्यासाठी लिपस्टिकचा कोणता रंग ठरेल सर्वोत्तम? जाणून घ्या...  
लिपस्टिक शेड
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 1:49 PM

मुंबई : बहुतेक स्त्रियांच्या बाबतीत असे घडते की, जेव्हा जेव्हा त्या बाजारात लिपस्टिक विकत घ्यायला जातात, तेव्हा बरेच शेड्स पाहून त्या गोंधळतात. सर्व शेड एकापेक्षा एक असल्याने आणि खूप वेगवेगळे रंग समोर असल्याने, आपल्यासाठी कोणते शेड योग्य असेल, हे समजणे कठीण होते. या गोंधळात बर्‍याच वेळा स्त्रिया कोणतीही शेड विकत घेतात. परंतु, ओठांवर ती शेड लावल्यानंतर चेहरा निस्तेज दिसू लागतो किंवा रंग गडद दिसू लागतो (Know about face color tone and which lipstick shade is best according to you face).

एखाद्याला स्वतःच्या त्वचेची नीट माहिती नसल्यामुळे असे घडते. लिपस्टिकचा प्रत्येक शेड प्रत्येकास अनुकूल असेलच, असे नाही. यासाठी त्वचेच्या रंगाकडेही नीट लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या त्वचेच्या टोननुसार योग्य लिपस्टिक शेड्स कशी निवडायची ते जाणून घेऊया…

गोरा रंग

जर आपला रंग अगदी गोरा असेल तर आपल्यासाठी बऱ्याच लिपस्टिक शेड्स उपयुक्त ठरू शकतात. फिकट गुलाबी, वाईन रेड, फिकट जांभळा, कोरल, पीच, न्यूड पिंक आणि चेरी रेड या शेड्स गोरा वर्ण असलेल्या महिलांना अनुकूल ठरतात. परंतु, त्यांनी गडद गुलाबी, ब्लड रेड आणि जास्त चमकदार किंवा शिमरी दिसणाऱ्या शेड्स टाळल्या पाहिजेत.

गव्हाळ रंग

जर, तुमचा रंग गव्हाळ असेल तर, म्हणजे गडद किंवा फारच गोरा नसल्यास आपण न्यूड शेड्स घेणे टाळले पाहिजे. कारण ते शेड्स आपल्या चेहऱ्यावर आणखी फिकट दिसू शकतात. अशा स्त्रियांवर तपकिरी रंगाची छटा योग्य आहेत. याशिवाय तुम्ही डार्क पिंक, ब्लड रेड, ब्रॉस, राईप ऑरेंज, सिनेमन रंग देखील निवडू शकता. पण मरून, नारंगी आणि गडद कॉफी शेड्स टाळा (Know about face color tone and which lipstick shade is best according to you face).

सावळा आणि गडद रंग

जर आपला रंग गडद असेल तर आपण ब्रिक रेड, ब्राऊनिश रेड आणि कॅरेमल कलर, कॉफी आणि बर्गंडी शेड्सच्या लिपस्टिक वापरुन पाहा. परंतु, या शेड्स ग्लॉसी नसून मॅट लिपस्टिकच्या शेड्स असाव्यात. ग्लॉसी शेड्स आपला रंग अधिक गडद बनवतात. त्याच वेळी, जर आपला रंग अधिक गडद असेल, तर आपण आपल्यासाठी ब्राऊन, लाल, जांभळा रंग निवडू शकता. याशिवाय, आपण हलका जांभळा, हलका गुलाबी, लॅव्हेंडर आणि आयव्हरी कलर्स यासारखे पेस्टल शेड देखील निवडू शकता.

लिपस्टिक लावण्याचा योग्य मार्ग कोणता?

त्वचेच्या टोननुसार योग्य शेड निवडल्यानंतर प्रथम ओठांवर लीप बाम लावा आणि हातांनी हळूवारपणे मालिश करा. यानंतर, लाईट प्राइमर किंवा फाउंडेशन लावा जेणेकरून लिपस्टिक जास्त काळ ओठांवर टिकून राहील. ओठांना लीप लायनरने एक चांगला आकार द्या, जो लिपस्टिकशी जुळेल. मग ब्रशच्या मदतीने ओठांवर लिपस्टिक लावा. आपण आपल्या बोटांचा देखील वापर करू शकता.

(Know about face color tone and which lipstick shade is best according to you face)

हेही वाचा :

VIDEO | पैठणीच्या पदरावर झोका घेणारे राधाकृष्ण, येवल्याच्या कुशल भावंडांची कारागिरी

Video | ‘Femina Miss India 2020’चा मानाचा ताज बनवण्यासाठी लागते ‘इतकी’ मेहनत, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.