AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : कोरफड आणि पपईचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो. कोरफडच्या मदतीने आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो.

Skin Care : कोरफड आणि पपईचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 1:41 PM
Share

मुंबई : कोरफडचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो. कोरफडच्या मदतीने आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. कोरफडाच्या पानांमध्ये  सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. कोरफडीचा गर त्वचेला थंडावा देतो. तसेच कोरफडमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. (Aloe vera and papaya face pack are extremely beneficial for the face)

आपण घरच्या-घरी कोरफडचे विविध फेसपॅक तयार करू शकतो. कोरड्या त्वचेची समस्या आणि चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी आपण खास फेसपॅक तयार करून शकतो. यासाठी आपल्याला 4 चमचे कोरफडचा गर, 3 चमचे पपईचा गर आणि 4 चमचे गुलाब पाणी लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा.

साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. कोरफडचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी आपल्याला तीन चमचे कोरफडचा गर लागणार आहे. त्यामध्ये हळद मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट साधारण 25 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा.

त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, कोरफडचा हा फेसपॅक तयार करण्यासाठी कोरफड नेहमीच ताजी असली पाहिजे. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून चार वेळा त्वचेला लावला पाहिजे. रात्रभर चेहऱ्यावर कोरफड लावून ठेवा. यातील पोषण तत्त्वे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात.

सर्वप्रथम फेस वॉशने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर कोरफड जेल चेहरा आणि मानेवर लावा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही एसेंशियल ऑइलचाही वापर करू शकता. चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर हे चेहऱ्यावर राहू द्या. नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. सोबत मुरुमांचे डाग देखील कमी होतात.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Aloe vera and papaya face pack are extremely beneficial for the face)

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.