5

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

हिवाळ्यामध्ये फ्लू किंवा सर्दी आणि खोकल्याची समस्या वाढते. या हंगामात आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते.

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:27 PM

मुंबई : हिवाळ्यामध्ये फ्लू किंवा सर्दी आणि खोकल्याची समस्या वाढते. या हंगामात आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते. ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. यावेळी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याकडे बरेच लक्ष दिले आहे. लोक अन्नापासून, आपली जीवनशैली निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत (Keep these foods away and stay safe from colds and coughs during the winter season).

या हंगामात, खाण्यापिण्याकडे जितके लक्ष दिले पाहिजे, तितकेच चुकीच्या गोष्टींपासून अंतर ठेवणे देखील आवश्यक आहे. हिवाळ्याच्या हंगामात काही पदार्थांचे सेवन केल्याने सर्दी-कफ होऊ शकतो. यामुळे थंडीत काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थांच्या फायद्यांबद्दल आपण बरेच काही ऐकले असेलच. पण थंड वातावरणात दुग्धजन्य पदार्थ शक्यतो टाळले पाहिजे. दुग्धजन्य पदार्थ सर्दी व कफ वाढवण्याचे काम करतात. परंतु, दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रोटीन आणि व्हिटामिन डीचे प्रमाण अधिक असते.  जे शरीरातील संक्रमणास विरोध करण्याचे कार्य करतात. म्हणून दुग्धजन्य पदार्थांचा वापर पूर्णपणे टाळण्याऐवजी मर्यादित प्रमाणात सेवन करा.

कॅफिन

कॅफिनयुक्त पदार्थ जसे की कॉफी, चहा आणि सॉफ्ट ड्रिंक्स सारखेपदार्थ शरीराला डीहायड्रेट करतात. ज्यामुळे कफ जमा होऊन, सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू होतो. तसेच रोग प्रतिकारशक्ती देखील अगदी कमकुवत झाल्यासारखे वाटू लागते. हिवाळ्याच्या काळात निरोगी राहण्यासाठी, कॅफिनेटेड पेयांचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करा.

तळलेले खाद्यपदार्थ

बहुतेक लोक हिवाळ्यात तळलेले खाद्य पदार्थ खाण्याला पसंती देतात. परंतु, या पदार्थांमुळे केवळ लठ्ठपणाची समस्याच नव्हे, तर सर्दी, खोकल्याची समस्यादेखील उद्भवू शकते. जंकफूड आणि चरबीयुक्त पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तेलामुळे कफ होतो, ज्यामुळे तापदेखील येऊ शकतो. म्हणून नेहमी चांगले आणि निरोगी अन्न खाऊन, आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करावी (Keep these foods away and stay safe from colds and coughs during the winter season).

मद्य

मद्यार्क शरीरात दाह वाढवण्यासाठी कार्य करते. यामुळे, पांढर्‍या रक्त पेशी अधिक कमकुवत होतात आणि शरीराला ठीक होण्यासाठी वेळ लागतो. म्हणूनच अल्कोहोलचे सेवन करणे टाळा, अन्यथा तुमची रोगप्रतिकार शक्ती पूर्णपणे कमकुवत होऊ शकते. त्यामुळे शरीर कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा सामना करण्यास सक्षम राहणार नाही.

गोड पदार्थ

अल्कोहोलप्रमाणेच गोड पदार्थ शरीरात दाह वाढवण्याचे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करण्याचे काम करतात. यामुळे सर्दी आणि खोकल्यासारखी समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच हिवाळ्याच्या काळात गोड पदार्थ खाण्याची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा.

(Keep these foods away and stay safe from colds and coughs during the winter season)

(टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?