AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aloe vera face packs : केस आणि त्वचा सुंदर मिळवण्यासाठी या 5 मार्गांनी कोरफडचा वापर नक्की करा!

कोरफड (Aloe vera) केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात थंड आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत होते. हे मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हे त्वचेला (Skin) नैसर्गिकरित्या ग्लोइंग बनवण्याचे काम करते. त्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत.

Aloe vera face packs : केस आणि त्वचा सुंदर मिळवण्यासाठी या 5 मार्गांनी कोरफडचा वापर नक्की करा!
कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 9:52 AM
Share

मुंबई : कोरफड (Aloe vera) केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात थंड आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत होते. हे मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हे त्वचेला (Skin) नैसर्गिकरित्या ग्लोइंग बनवण्याचे काम करते. त्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हे सुरकुत्या (Wrinkles) आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करते. ते त्वचेचे खोलवर पोषण करण्याचे काम करतात. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

हेअर सीरम म्हणून वापरा

केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेलचाही वापर करू शकता. हेअर सीरम म्हणून कोरफड जेल वापरा. हे केसांना चमकदार होण्यास मदत करते. कोरफडमध्ये आपण दही मिक्स करून देखील आपल्या केसांना लावू शकतो.

त्वचा मऊ करण्यास मदत

कोरफड जेल मेकअप प्राइमर म्हणून काम करते. ते त्वचेला मऊ आणि पोषण करण्यास मदत करते. मेकअप प्राइमर म्हणून वापरण्यासाठी, कोरफड जेल खूप कमी प्रमाणात घ्या. त्वचेवर लावा आणि काही वेळ मसाज करा.

कोरफडमध्ये असलेले महत्वाचे घटक

कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडचा वापर करून आपण आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. कोरफड जीवनसत्त्व ए, सी, ई, बी 12 आणि फॉलिक ऍसिड सारख्या आवश्यक जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. यामुळे आपण नेहमीच कोरफड आपल्या त्वचेला लावली पाहिजे.

कोरफड आणि खोबरेल तेल

हा मास्क केस लांब आणि जाड बनवण्यास मदत करतो. कोरड्या केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करते. यामुळे केस मऊ होतात. यासाठी तुम्हाला 2 चमचे कोरफड जेल आणि 3 चमचे खोबरेल तेल लागेल. ते तयार करण्यासाठी, कोरफड जेल आणि खोबरेल तेल मिसळा आणि हे मिश्रण 30 मिनिटे मंद आचेवर शिजवा. हलक्या हातांनी टाळूवर मालिश करा.

कोरड्या त्वचेची समस्या दूर

कोरडी त्वचा आणि जळजळ या समस्या दूर करण्यासाठी कोरफडीचा वापर केला जाऊ शकतो. केळी आणि मध ज्यात मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत. हे कोरडेपणापासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. एका वाटीमध्ये 1 टीस्पून कोरफड जेल, 1 टीस्पून मॅश केलेले केळे आणि 1 टीस्पून मध मिसळा. हे त्वचेला लावा आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health care tips : निरोगी आहार म्हणजे नेमके काय? जाणून घ्या या विषयी सविस्तर…

Skin Care Tips : उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी वापरा दह्याचा फेसपॅक, ‘असा’ बनवा फेसपॅक घरच्या घरी

Follow Us
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...