AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Benefits Of Grapeseed Oil : त्वचा उजळवायचीय?, मग द्राक्षांच्या बियांचं तेल वापराच!

आजकाल तुम्हाला बाजारात ब्युटी ऑईलचे अनेक पर्याय दिसतील. परंतु यापैकी एक निवडणे फारच अवघड आहे. द्राक्षाच्या बियांचे तेल देखील त्वचेसाठी फायदेशीर आहे. द्राक्षाच्या बियाच्या तेलात ओमेगा फॅटी अॅसिडस् आणि व्हिटॅमिन ई असतात.

Benefits Of Grapeseed Oil : त्वचा उजळवायचीय?, मग द्राक्षांच्या बियांचं तेल वापराच!
द्राक्षाचे तेल
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 5:18 PM
Share

मुंबई : आजकाल तुम्हाला बाजारात ब्युटी ऑईलचे अनेक पर्याय दिसतील. परंतु यापैकी एक निवडणे फारच अवघड आहे. द्राक्षाच्या बियांचे तेल देखील त्वचेसाठी फायदेशीर आहे. द्राक्षाच्या बियाच्या तेलात ओमेगा फॅटी अॅसिडस् आणि व्हिटॅमिन ई असतात. हे त्वचेसाठी टॉनिक म्हणून कार्य करते. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट गुणधर्म त्वचा सुंदर ठेवण्यासाठी कार्य करतात. त्वचा संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी हे तेल अत्यंत फायदेशीर आहे. (Apply Grapeseed Oil on the face for glowing skin)

मुरुमावर उपचार करण्यासाठी – द्राक्षाच्या तेलात लिनोलिक अॅसिड असते. ज्यामध्ये ओमेगा -6 फॅटी अॅसिड असते. हे मुरुमावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. यामुळे आपण द्राक्षाचे तेल चेहऱ्याला लावले पाहिजे.

काळे डाग कमी होतात – द्राक्षाच्या तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि लिनोलिक अॅसिड काळे डाग आणि सनस्पॉट्स हलके करू शकतात.

रॅडिकल्सपासून संरक्षण करते – द्राक्षाच्या तेलात इतर अनेक संयुगे असतात. हे कॅरोटीन्स, जीवनसत्त्वे सी, डी, ई आणि पॉलीफेनॉल देखील समृद्ध आहे. या सर्व संयुगामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट क्षमता आहे. जे आपल्या त्वचेला हानिकारक अतिनील किरण आणि मुक्त रॅडिकल्समुळे होणार्‍या नुकसानापासून संरक्षण करते.

त्वचेला ओलावा मिळतो – द्राक्षाचे तेल व्हिटॅमिन ईमध्ये समृद्ध असते. जे त्वचेला मॉइस्चराइझ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. याचे कारण असे आहे की, त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे त्वचेचा बाह्य थर मऊ करतात आणि हायड्रेट करतात.

बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करते – द्राक्षाच्या तेलात पॉलिफेनॉल असतात. हे अकाली वृद्धत्व आणि सुरकुत्या रोखण्यास मदत करते. फॅटी अॅसिडसह पॉलिफेनॉल अभिसरणांना प्रोत्साहन देते. हे अकाली वृद्धत्व होण्याची चिन्हे कमी करण्यात मदत करतात.

सुंदर त्वचा – आपल्या त्वचेवर नियमितपणे द्राक्षाचे तेल लावल्याने त्वचेत व्हिटॅमिन ई आणि सी दोन्ही मिळते. यामुळे आपली त्वचा चांगली होण्यास मदत होते. फॅटी अॅसिडसमवेत द्राक्षाच्या तेलामध्ये पॉलीफेनॉल देखील असते. द्राक्षाच्या तेलात नैसर्गिक गुणधर्म देखील आढळतात जे त्वचा घट्ट करण्यास मदत करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apply Grapeseed Oil on the face for glowing skin)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...