AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : त्वचेला खोलवर मॉइश्चरायझिंग करण्यासाठी लोणी आणि बदाम तेल फायदेशीर, वाचा!

चमकदार आणि डागमुक्त त्वचा सर्वांनाच हवी असते. आपली त्वचा चमकदार बनावी, असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु, यासाठी आपल्याला आपल्या सवयींमध्ये काही सुधारणा कराव्या लागतील.

Skin Care : त्वचेला खोलवर मॉइश्चरायझिंग करण्यासाठी लोणी आणि बदाम तेल फायदेशीर, वाचा!
सुंदर त्वचा
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 28, 2021 | 8:35 AM
Share

मुंबई : चमकदार आणि डागमुक्त त्वचा सर्वांनाच हवी असते. आपली त्वचा चमकदार बनावी, असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु, यासाठी आपल्याला आपल्या सवयींमध्ये काही सुधारणा कराव्या लागतील. तसेच, काही नवीन सवयी अंगीकाराव्या लागतील. यातील सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे ही आहे. सकाळी लवकर उठणे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. (Butter and almond oil are beneficial for the skin)

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण वेगवेगळे साैदर्य उत्पादने वापरतो. त्याचसोबत आपल्या जीवनशैलीमध्ये देखील बदल करतो. मात्र, सुंदर त्वचा मिळवण्यासाठी फक्त तेवढेच पुरेसे नसून त्यासाठी त्वचेला खोलवर मॉइश्चरायझिंग करणे देखील खूप आवश्यक आहे. वर-वरून त्वचा स्वच्छ ठेवण्याचा काहीही उपयोग होत नाहीतर आपली त्वचा खोलवर मॉइश्चरायझिंग करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे घरच्या काही साहित्याच्या आधारे आपण त्वचा खोलवर मॉइश्चरायझिंग करू शकतो. यासाठी आपल्या लोणी आणि बदाम तेल लागणार आहे.

एक चमचा लोणी आणि एक चमचा बदाम तेल व्यवस्थित मिक्स करा. या तेलाने आपल्या त्वचेवर आणि हाता-पायांवर हलक्या हाताने मसाज करा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने त्वचेची खोलवर मॉइश्चरायझिंगही होते. हे करताना नेहमी लक्षात ठेवा की, लोणी हे नेहमीच ताजे असावे. लोणी आणि तेलाने मॉइश्चरायझिंग केल्यानंतर घराच्या बाहेर पडताना नेहमी अगोदर अंघोळ करा आणि मग घराच्या बाहेर पडा. कारण तेलामुळे हात आणि पायांवर धुळ बसण्याची शक्यता असते.

दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सर्नबर्न आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. सन बर्न कमी करण्यासाठी त्वचेवर दही लावा आणि 15 मिनिटांनंतर त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. टॅनिंग काढून टाकण्यासाठी दह्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन पीठ आणि लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि कोरडे होऊ द्या. मिश्रण चांगले कोरडे झाल्यावर त्वचा पाण्याने धुवा. आपल्याला काही दिवसांतच याचा फरक दिसून येईल.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Butter and almond oil are beneficial for the skin)

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?