दही आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक त्वचेला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा !

सध्याच्या हंगामात आरोग्याबरोबरच त्वचेची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. कारण याच काळात आपली त्वचा तेलकट आणि कोरडी होते. यासाठी आपण घरगुती उपचार करून आपली त्वचा तजेलदार आणि सुंदर करू शकतो.

दही आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक त्वचेला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा !
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 5:10 PM

मुंबई : सध्याच्या हंगामात आरोग्याबरोबरच त्वचेची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. कारण याच काळात आपली त्वचा तेलकट आणि कोरडी होते. यासाठी आपण घरगुती उपचार करून आपली त्वचा तजेलदार आणि सुंदर करू शकतो. आज आम्ही तुम्हाला खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे यामुळे कोणतेही दुष्परिणाम आपल्या त्वचेला होणार नाहीत. (Face pack of curd and rice flour is beneficial for the skin)

दही आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी चार चमचे दही, दोन चमचे तांदळाचे बारीक केलेले पीठ आणि गुलाब पाणी लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट साधारण 30 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून चार वेळा लावला पाहिजे.

दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सर्नबर्न आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. सन बर्न कमी करण्यासाठी त्वचेवर दही लावा आणि 15 मिनिटांनंतर त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. टॅनिंग काढून टाकण्यासाठी दह्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन पीठ आणि लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि कोरडे होऊ द्या. मिश्रण चांगले कोरडे झाल्यावर त्वचा पाण्याने धुवा. आपल्याला काही दिवसांतच याचा फरक दिसून येईल.

केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे. दहीमध्ये लैक्टोज असते. यामुळे तुमची पाचकशक्ती वाढते. ज्यांचे पचन तंत्र कमकुवत आहे अशा लोकांसाठी ते फायदेशीर आहे, कारण दही पचणे खूप सोपे आहे.दही हा एक उत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे. त्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. दही अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Face pack of curd and rice flour is beneficial for the skin)

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.