Beauty Tips : चमकदार त्वचेसाठी काजूचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वापरायचे कसे हे जाणून घ्या!

| Updated on: Sep 06, 2021 | 3:32 PM

पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात, आपण त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतो. पण तुम्हाला माहीत आहे का? काजू त्वचेचा रंग वाढवण्यासाठी काम देखील करतो. काजू आरोग्याव्यतिरिक्त त्वचेसाठी फायदेशीर आहे.

Beauty Tips : चमकदार त्वचेसाठी काजूचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वापरायचे कसे हे जाणून घ्या!
काजू फेसपॅक
Follow us on

मुंबई : पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात, आपण त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतो. पण तुम्हाला माहीत आहे का? काजू त्वचेचा रंग वाढवण्यासाठी काम देखील करतो. काजू आरोग्याव्यतिरिक्त त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात असलेले पोषक घटक असतात, ते आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. काजूचा फेसपॅक नेमका कसा तयार करायचा हे आपण बघणार आहोत. (Cashew’s face pack is extremely beneficial for the skin)

काजूमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन ई भरपूर असते. जे त्वचेची चमक वाढवण्यास मदत करतात. त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. याशिवाय केसांसाठी देखील काजू फायदेशीर आहे. खरं तर, काजूमध्ये प्रथिने आणि तांबे असते. जे केस जाड आणि मजबूत बनवण्यास मदत करतात. तसेच केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करते.

काजू फेसपॅक

काजू फेसपॅक बनवण्यासाठी 8 ते 10 काजू दुधात भिजवून अर्धा तास ठेवा. नंतर काजू बारीक करून पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये दोन चमचे बेसन घाला. या सर्व गोष्टी नीट मिक्स करून पेस्ट तयार करा. सर्वात आधी दुधात कापसाचा गोळा टाकून चेहरा आणि मान स्वच्छ करा. यानंतर चेहऱ्यावर काजूची पेस्ट लावा. ही पेस्ट 20 मिनिटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावा. तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठी हा फेस पॅक फायदेशीर आहे.

काजू फेसपॅकचे फायदे

काजू फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील हरवलेली चमक परत येते. यासह, हे बारीक रेषा कमी करण्यास देखील मदत करते. सनबर्न आणि टॅनिंगच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही या फेसपॅकचा वापर करू शकता. याशिवाय, यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. काजू त्वचेला पोषण आणि घट्ट करण्याचे काम करते.

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेल फायदेशीर आहे. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं. ब्लॅकहेड्सची समस्याही दूर होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी बदामाचे तेल, बदाम पेस्ट किंवा बदामाचे दुधाचा वापर आपण करू शकता. यासाठी काही बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर भिजलेले बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Milk Benefits | दररोज एक ग्लास गरम दूध सेवन करा, ‘या’ आजारांना दूर पळावा!

(Cashew’s face pack is extremely beneficial for the skin)