नारळ पाण्याचे सेवन, आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Jun 17, 2021 | 2:31 PM

व्यस्त शेड्युलमधून प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेता येणे शक्य होत नाही. आरोग्याबरोबरच आपले त्वचेकडे दुर्लक्ष होते. यामुळे आपली त्वचा खराब होत जात आहे. तुम्ही त्वचेची काळजी घेणारी अनेक उत्पादने वापरली असतील.

नारळ पाण्याचे सेवन, आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
नारळ पाणी

मुंबई : व्यस्त शेड्युलमधून प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेता येणे शक्य होत नाही. आरोग्याबरोबरच आपले त्वचेकडे दुर्लक्ष होते. यामुळे आपली त्वचा खराब होत जात आहे. तुम्ही त्वचेची काळजी घेणारी अनेक उत्पादने वापरली असतील, पण आज आम्ही नारळ पाण्याच्या अशा गुणधर्मांबद्दल सांगणार आहोत, जे या उन्हाळ्याच्या काळात आपल्याला हायड्रेटच ठेवणार नाहीत तर आपल्या त्वचेशी संबंधित बर्‍याच समस्या दूर करेल. (Consumption of coconut water is also beneficial for the skin along with health)

नारळाच्या पाण्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे मुरुमांशी लढण्यास मदत करतात. ते त्वचेवरील मुरुमांच्या डागांपासून मुक्त होण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी मदत करतात. हे स्वतःहून आपले कार्य करणार नाही, नारळपाणी हे आपल्या नियमित स्किनकेअर रुटीनमध्ये एक चांगली भर आहे. नारळ पाण्यामध्ये अमीनो अॅसिड देखील असते जे कोरड्या त्वचेवर उपचार करण्यासाठी खूप चांगले असते. नारळपाण्यात इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण जास्त असल्याने सूर्य प्रकाशापासून त्वचेचा बचाव करण्यास देखील हे मदत करते.

नारळाचे सेवन करून आपण शरीराला हायड्रेटेड ठेवून, किडनी स्टोनचा आजार टाळू शकता आणि नारळपाणी शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी एक चांगला स्त्रोत आहे. नारळपाण्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराईड्स कमी होऊन हृदयरोग होण्याचा धोकाही कमी होतो. नारळाच्या पाण्यात पर्याप्त प्रमाणात पोटॅशियम असते, त्यामुळे रक्तदाब कमी होण्यासही मदत होते. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध नारळपाणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून इतर रोगांशी लढण्यासही मदत करतो.

हिरव्या कच्च्या नारळातून निघणारे गोड पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे, ज्यामध्ये शून्य कॅलरी असतात. यासह, इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Consumption of coconut water is also beneficial for the skin along with health)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI