AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केळी, कलिंगड, आंबा आणि कोरफडचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते.

केळी, कलिंगड, आंबा आणि कोरफडचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
सुंदर त्वचा
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 29, 2021 | 7:39 AM
Share

मुंबई : आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली हवी असेल तर घरगुती उपाय करा आणि त्वचा चांगली मिळवा. आपल्या चेहऱ्यासाठी फळांचे फेसपॅक नेहमीच फायदेशीर असतात. (Face pack of banana, watermelon and mango is beneficial for the skin)

केळी, कलिंगड, आंबा आणि कोरफडचा फेसपॅक आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार होण्यास मदत होते. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यासाठी अर्धी केळी, दोन काप कलिंगड, एक काप आंबा आणि तीन चमचे कोरफडीचा गर घ्या आणि यासर्वांची चांगली पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यासह मानेवर लावा. साधारण एक तास ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

हा फेसपॅक आपण आठ दिवसातून एकदा तरी लावला पाहिजे. यामुळे आपल्या त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. आंब्यात व्हिटॅमिन ए असते जे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला दोन चमचे गव्हाचे पीठ आणि एक चमचे मध एक चमचे आंब्याचा रस लागणार आहे, हे सर्व एकत्र चांगले मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा.  ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार होईल.

अर्धी केळी, अर्धा लिंबू प्रथम केळी मॅश करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये लिंबू पिळून घ्या. तयार मिश्रणाने बाधित त्वचेची मालिश 5 ते 7 मिनिटे आणि नंतर 15 मिनिटांवर ठेवा. त्यानंतर ते ताजे पाण्याने धुवा आणि ते स्वच्छ करा. आपण दररोज वापरू शकता. जर आपल्या त्वचेवरचे तेज कमी झाले असले आणि तेज परत आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर आज आम्ही एक खास फेसपॅक सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरची चमक वाढू शकतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Face pack of banana, watermelon and mango is beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली