AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पपई आणि बीटचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते.

पपई आणि बीटचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 9:34 AM
Share

मुंबई : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी आपण घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे नेहमीसाठीच आपली त्वचा सुंदर होते. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही. (Face pack of papaya and beet is beneficial for the skin)

चमकदार आणि तजेलदार त्वचा करण्यासाठी आपण पपई आणि बीटचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होते. यासाठी अर्धी वाटी पपईचा लगदा आणि बीटचा रस तीन चमचे घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण अर्धा तास हा पॅक आपल्या चेहऱ्याला लावा आणि त्यानंतर शक्यतो कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक आपण आठवड्यातून किमान चार ते पाच वेळा लावला पाहिजे. यामुळे आपल्या त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

पपईमध्ये व्हिटामिन ए, पपाइन आणि व्हिटामिन सी असतं. हे तत्व त्वचेची टॅनिंग कमी करण्यात मदत करतात. पपईमध्ये पपाइन प्रथिने असतात. केसांची वाढ होण्यात याचा उपयोग होतो. यामुळे केस गळण्याची समस्याही संपते. पपईमध्ये खोबरे तेल किंवा व्हिनेगर मिक्स करुन डोक्यावर लावल्यास डोक्यातील कोंडाची समस्या दूर होते. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तुम्ही पपईचा हा फेसपॅकही लावू शकता. पपई अँटी-एजिंगच्या समस्येवर मात करण्यास मदत करते. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण बीटचा फेसपॅक घरच्या घरी तयार करू शकतो. ताज्या बीटचा रस, दही, बेसन पीठ आणि लिंबाचा रस आवश्यक असेल. फेसपॅक तयार करण्यासाठी हरभरा पीठ, दही, लिंबाचा रस आणि बीटचा रस एकत्र मिसळा आणि चांगली पेस्ट तयार करा. संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि वीस मिनिटांनंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. गुलाबी त्वचा मिळविण्यासाठी त्वचेवर बीटचा रस लावा आणि काही दिवसातच त्याचा परिणाम दिसून येईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care | मसूर डाळीच्या फेसपॅकने उजळेल चेहऱ्याचे सौंदर्य, वाचा या फेसपॅकचे फायदे…

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Face pack of papaya and beet is beneficial for the skin)

Follow Us
जय पवारांकडून स्वत:च्याच उमेदवारीचे संकेत
जय पवारांकडून स्वत:च्याच उमेदवारीचे संकेत.
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.