AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कच्चे दूध, गुलाब पाणी आणि बेसन पीठाचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!

सुंदर आणि तजेलदार त्वचा दिसण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महिला पार्लरमध्ये जातात तसेच विविध साैंदर्य़ उत्पादने वापरतात.

कच्चे दूध, गुलाब पाणी आणि बेसन पीठाचा 'हा' फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!
फेसपॅक
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 27, 2021 | 8:16 AM
Share

मुंबई : सुंदर आणि तजेलदार त्वचा दिसण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महिला पार्लरमध्ये जातात तसेच विविध साैंदर्य़ उत्पादने वापरतात. ज्यामुळे त्वचा सुंदर दिसेल. मात्र, एवढे करूनही त्वचा सुंदर होत नाही. जर आपल्याला खरोखरच आपली त्वचा सुंदर आणि चमकदार हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार दिसण्यास मदत होते. (Face pack of raw milk, rose water and gram flour is beneficial for the skin)

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण कच्चे दूध, गुलाब पाणी आणि बेसन पीठाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर लावला पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपण तीन चमचे कच्चे दूध, गुलाब पाणी दोन चमचे आणि बेसन पीठ दोन चमचे घेतले पाहिजे. सर्वात अगोदर वरील सर्व घटक एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा.

साधारण 30-35 मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर आपला चेहऱ्या कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून चार वेळा लावला पाहिजे. मध, चंदन पावडर आणि साखरेचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी मध आणि चंदन पावडर मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये शेवटी साखर मिक्स करा आणि ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा.

साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर त्वचेचा मसाज करा आणि कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. ऑलिव्ह ऑईल, पुदिना आणि बेसन पीठाचा फेसपॅक वापरू शकतात. हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने पावसाळ्याच्या हंगामातही एक ग्लो चेहऱ्याला येतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला ऑलिव्ह ऑईल, पुदिना आणि बेसन पीठ लागणार आहे. यासाठी सर्वात अगोदर ऑलिव्ह ऑईल 2 चमचे, पुदिन्याच्या पानांची तीन चमचे पेस्ट आणि एक चमचा पाणी लागणार आहे. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा आणि वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संंबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Face pack of raw milk, rose water and gram flour is beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली