AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागडे ब्युटी प्रोडक्ट विसरा, उन्हाळ्यात तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतील ‘ही’ फळं

ही उन्हाळी फळं तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देतील आणि तुमचा चेहरा निरोगी ठेवण्यास मदत करतील. चला तर मग आजच्या या लेखात या फळांविषयी जाणून घेऊयात.

महागडे ब्युटी प्रोडक्ट विसरा, उन्हाळ्यात तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतील 'ही' फळं
महागडे ब्युटी प्रोडक्ट विसरा, उन्हाळ्यात तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतील 'ही' फळंImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 9:27 PM
Share

उन्हाळ्याच्‍या दिवसात तापमान वाढतच असते, ज्यामुळे चेहऱ्यावरील तेज नाहीसे होऊन त्वचा काळवंडते . तर या टॅन झालेल्या त्वचेवर चमक आणण्यासाठी लोकं बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का की निसर्गाने आपल्याला उन्हाळ्यात अशी फळे दिली आहेत जी आपले नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. तर या फळांचे सेवन आरोग्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर ठरते.आजच्या लेखात अशाच उन्हाळ्यातील फळांबद्दल जाणून घेणार आहोत जी तुमच्या त्वचेला नैसर्गिक तेज देतील.

उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी या फळांचे करावे सेवन

1. नारळाचे पाणी

नारळाचे पाणी शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास आणि त्वचा चमकदार व कोमल ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात दररोज नारळाचे पाणी प्यायल्याने तुमचे पोट आणि त्वचा दोन्ही निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.

2. कलिंगड

कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि पाणी भरपूर प्रमाणात असते. यातील व्हिटॅमिन सी त्वचेचा काळपटपणा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे या प्रखर उन्हाळ्यात त्वचा टॅन होण्याची चिंता वाटत असेल तर तुमच्या आहारात कलिंगडाचा समावेश करा. चेहऱ्यावर चमक आणण्यापासून ते शरीराचे तापमान संतुलित राखण्यापर्यंत कलिंगड खूप उपयुक्त आहे.

3.काकडी

काकडी केवळ सॅलडचाच भाग नाही, तर काकडी ही पोट आणि त्वचा या दोन्हींसाठी आरोग्याचा खजिना आहे. काकडी संपूर्ण शरीराला थंडावा देते आणि चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करण्यासही मदत करू शकते. त्वचेच्या अनेक उपचारांमध्ये काकडीचा वापर केला जातो.

4. आंबा

आंब्याच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण होत असली तरी, तो त्वचेसाठी फायदेशीर आहे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे चेहऱ्याची कमी झालेली चमक परत आणण्यास मदत करतात. योग्य प्रमाणात आंब्याचे सेवन करणे संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरते.

5. संत्र

संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्याच्या सालीपासून ते गरापर्यंत ते त्वचेसाठी फायदेशीर ठरते. संत्री केवळ चेहऱ्याचे खोलवर पोषणच करत नाहीत, तर काळे डाग कमी करण्यासही मदत करतात. संत्र्याच्या सालीचा वापर फेस पॅकमध्येही केला जातो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...