AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुंदर मी होणार! लिंबाच्या रसामध्ये ‘हे’ घटक मिक्स करून चेहऱ्याला लावा, फरक बघाच!

आपल्या सर्वांना माहीती आहे की, लिंबू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबाचा आहारात समावेश केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

सुंदर मी होणार! लिंबाच्या रसामध्ये 'हे' घटक मिक्स करून चेहऱ्याला लावा, फरक बघाच!
लिंबाचा रस
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 3:13 PM
Share

मुंबई : आपल्या सर्वांना माहीती आहे की, लिंबू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबाचा आहारात समावेश केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे आपण अनेक आजारांपासून देखील दूर राहू शकतो. मात्र, हे छोटेसे लिंबू आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. लिंबाच्या रसामध्ये आपण काही घटक मिक्स करून त्वचेच्या समस्या दूर करू शकतो. (Lemon juice is beneficial for the skin)

-विशेष म्हणजे लिंबामुळे आपल्या त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास देखील मदत होते. आपण जर तीन चमचे बेसन पीठामध्ये चार चमचे लिंबाचा रस मिक्स करून चांगली पेस्ट तयार करून आपला चेहऱ्याला लावली तर आपला चेहरा चमकदार आणि सुंदर दिसण्यास मदत होईल. हा उपाय आपण दर आठ दिवसातून दोनदा केला पाहिजेत.

-मध, लिंबू आणि चंदन पावडरचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला मध 2 चमचे, चंदन पावडर 3 चमचे, 2 चमचे लिंबाचा रस आणि गुलाब पाणी लागणार आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा.

-लिंबूमध्ये साइट्रिक अॅसिड असते. हे त्वचेचे तेल नियंत्रित करण्यास मदत करते. मुरुमांचे मुख्य कारण असलेल्या तेल आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करू शकते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी 2 चमचे दही 2 चमचे लिंबाचा रस मिक्स करा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा.

-मुलतानी माती, मध आणि लिंबाचा फेसपॅक तयार करण्यासाठी मुलतानी माती एक चमचा, लिंबाचा रस एक चमचा आणि मध एक चमचा मिक्स करून घ्या आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला आणि मानेला लावा. साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Lemon juice is beneficial for the skin)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...