AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care : दुधावरची साय त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

दूध हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधात प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटक असतात.

Skin care : दुधावरची साय त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 12:38 PM
Share

मुंबई : दूध हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधात प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटक असतात. फक्त दुधच नाही तर दुधावरची साय देखील आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. आपण जर दुधावरची साय आपल्या चेहऱ्याला लावली तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. (Milk cream is beneficial for the skin)

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या संपूर्ण चेहऱ्याला दुधावरची साय लावली पाहिजे. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावर अर्धा तासांसाठी साय लावा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. विशेष म्हणजे सतत एक महिना आपण साय चेहऱ्याला लावली तर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी दुधावरची साय, गुलाब पाणी, हळद, चंदन पावडर आणि खोबरेल तेल हे साहित्य लागणार आहे. सर्वात प्रथम दुधावरच्या सायमध्ये हळद,गुलाब पाणी, चंदन पावडर आणि खोबरेल तेल मिक्स करा. ही पेस्ट काही वेळ तशीच ठेवा आणि त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. साधारण वीस मिनिटांनंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. ही पेस्ट आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावू शकतो.

आपली त्वचा सतत कोरडी पडत असेल तर आपण चेहऱ्याला दुध देखील लावू शकतो. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. जर आपल्याला चेहऱ्यावरील डाग काढून टाकायचे असतील, तर 1 चमचा चंदन पावडरमध्ये 2 चमचे दूध घालून पेस्ट बनवा. आता त्यात एक चमचा बदाम पावडर मिक्स करा. या तिन्ही घटकांना चांगले मिसळा आणि ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Milk cream is beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली