AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कडुलिंब आणि कढीपत्त्याचा ‘हा’ हेअर मास्क केसांना लावा आणि सुंदर केस मिळवा!

आपल्याला सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर आपण केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सुंदर केसांसाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिेजेत. ज्यामुळे आपले केस सुंदर होण्यास मदत होते.

कडुलिंब आणि कढीपत्त्याचा 'हा' हेअर मास्क केसांना लावा आणि सुंदर केस मिळवा!
हेअर मास्क
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 4:53 PM
Share

मुंबई : आपल्याला सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर आपण केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सुंदर केसांसाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिेजेत. ज्यामुळे आपले केस सुंदर होण्यास मदत होते. घरगुती हेअर मास्कमुळे केस सुंदर आणि निरोगी होण्यास मदत होते. हे केसांच्या वाढीस मदत करते. हे केस गळणे देखील कमी करू शकते. (Neem and curry hair mask beneficial for hair)

केसांची काळजी घेण्यासाठी कढीपत्ता आणि कडुलिंबाचा हेअरपॅक फायदेशीर आहे. हे हेअर पॅक बनवण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याची पावडर तसेच कडुलिंबाची पावडर वापरू शकता. काही कडुलिंबाची पाने सुकवा आणि नंतर बारीक करून पावडर बनवा. याशिवाय, मूठभर कढीपत्ता घ्या आणि त्यांना बारीक करून पावडर बनवा. 2-3 चमचे कडुलिंबाची पाने आणि कढीपत्त्याची पावडर एका भांड्यात घ्या. त्यांना एकत्र मिसळा आणि नंतर त्यात थोडे पाणी घाला आणि पेस्ट तयार करा.

ते टाळूवर लावा आणि काही मिनिटांसाठी हलक्या हातांनी मालिश करा. एक तास सोडा. यानंतर डोके सौम्य शैम्पूने धुवा. केसांच्या काळजीसाठी, तुम्ही हे हेअर पॅक कढीपत्ता आणि कडुलिंबासह आठवड्यातून दोनदा लावू शकता. यामुळे आपली केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल. हिबिस्कस अर्थात जास्वंदाची आठ फुले व आठ पाने घ्या आणि त्यांना चांगले धुवून, त्याची बारीक पेस्ट बनवा.

आता एका सॉसपॅन/तव्यामध्ये एक कप नारळ तेल गरम करा आणि त्यात ही पेस्ट घाला आणि एकदा ढवळा. नंतर गॅस बंद करा आणि सॉसपॅनला थोड्यावेळासाठी झाकून ठेवा. थंड झाल्यावर, ते एका कंटेनरमध्ये भरा आणि आठवड्यातून किमान तीन दिवस केसांवर लावा. यामुळे केस गळती कमी होते. आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफड खूप उपयुक्त आहे.

कोरफड, नारळ तेल आणि कांद्याचा रस यांचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. तेल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा आणि केसांना लावा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Neem and curry hair mask beneficial for hair)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली